राजापूर : तालुक्यासाठी एमडी फिजिशियन डाॅक्टरची आवश्यकता असून, भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी हा डाॅक्टर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार राजन साळवी यांनी केली आहे. आपली ही मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी त्यांच्यापर्यंत पाेहाेचवून तालुकावासीयांची हाेणारी गैरसाेय दूर करावी, असेही आमदार साळवी यांनी म्हटले आहे.
भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरीसाठी कोरोना संकटात आवश्यक त्या मदतीचा हात देण्याची ग्वाही देत आवश्यकता भासल्यास एमडी फिजिशियन डॉक्टरही उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. त्याच अनुषंगाने राजापुरात ओणी येथे सुरू होणाऱ्या कोविड रुग्णालयासाठी एमडी फिजिशियन डॉक्टरची आवश्यकता आहे. राजापूर तालुक्यासाठी नीलेश राणे यांनी डॉक्टर उपलब्ध करून द्यावा, आपली ही मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी राणे यांच्याकडे पोहोचवावी, असे आवाहन आमदार साळवी यांनी केले आहे.