शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:02 IST

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यामध्ये हस्तक्षेप आणि जमावबंदी आदेशाचे ...

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यामध्ये हस्तक्षेप आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार नीलेश राणे व त्यांच्यासोबत असलेल्या १६ जणांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी मध्यरात्री १२.०५ ते १२.४५ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी नीलेश राणेंसह सहकाऱ्यांविरोधात रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक मंगळवारी रात्री पावणेबारा वाजल्यापासून हातखंबा येथे वाहनांची तपासणी करीत होते. रात्री १२.०५ वाजता नीलेश राणे सहकाऱ्यांसह तेथे आले. त्यांची वाहने तपासणीसाठी पोलिसांनी थांबवली. मात्र, त्यावेळी नीलेश राणे व त्यांच्या सहकाºयांनी अश्लील शिवीगाळ तसेच आरडाओरडा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची धमकी दिली आणि शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला. बेकायदेशीर जमाव गोळा करून जमावबंदी आदेशाचाही भंग केला, असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप हातखंबा येथे नेमके काय घडले याची माहिती घेण्यासाठी तेथे आले. मात्र, अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारण्याच्या उद्देशाने नीलेश राणे व त्यांचे सहकारी त्यांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी जाण्याची सूचना केल्यानंतरही ते तेथेच थांबून शिवीगाळ करीत होते, असेही इंगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम १४३, १४५, १४९, १५१, १५३, १८६, २९४, ३५२, ५०४, ५०६ तसेच सह. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, ११०/११७, ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पंडित पाटील अधिक तपास करीत आहेत.अन्य वाहनेही तपासाहातखंबा येथे मंगळवारी मध्यरात्री स्वाभिमानचे लोकसभा उमेदवार नीलेश राणे यांच्या ताफ्यातील वाहने पोलिसांनी तपासणीसाठी थांबविली. त्यानंतर नीलेश राणे व सहकाºयांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. त्यावेळी नीलेश राणे यांनी आमचीच वाहने का तपासता, अन्य वाहने का तपासली जात नाहीत, असा सवाल केला. त्यानंतर वादावादी झाली व त्यातूनच पुढील प्रकार उद्भवल्याची चर्चा हातखंबा परिसरात आहे.