शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

निकम यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST

खेड : येथील नगर परिषदेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी कृष्णा गंगाराम निकम निवृत्त झाले. त्यांना नगर परिषदेचे कर्मचारी संघटना तसेच ...

खेड : येथील नगर परिषदेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी कृष्णा गंगाराम निकम निवृत्त झाले. त्यांना नगर परिषदेचे कर्मचारी संघटना तसेच नगर परिषदेतर्फे निरोप देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर उपस्थित होते.

निर्जंतुकीकरण

चिपळूण : तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. याशिवाय जनजागृती करून ग्रामस्थांना आरोग्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने ग्रामपंचायतीतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.

रुग्णालयासाठी मदत

चिपळूण : येथील ज्ञानप्रबोधिनीतर्फे उत्तम गुणवत्तेचा एक व्हेंटिलेटर व दोन ऑक्सिजन सयंत्रे डेरवण येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयात भेट देण्यात आली. या उपकरणासाठी तीन लाख ७० हजार रुपये खर्च करण्यात आले. त्यासाठी ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनतर्फे भरीव मदत केल्याबद्दल रुग्णालय प्रमुख डॉ. सुवर्णा पाटील यांनी आभार व्यक्त केले.

वृक्षारोपण

खेड : शहरातील समर्थनगर येथील सभापती निवासाच्या परिसरात आमदार योगेश कदम यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सभापती मानसी जगदाळे व सभापती जीवन आंब्रे, शशिकांत चव्हाण, अरुण कदम, अजिंक्य मोरे, करण चव्हाण, प्रकाश मोहिते, महेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

कामाला वेग

चिपळूण : गृहअलगीकरण बंद केल्यानंतर प्रशासनाने आता गाव स्तरावर विलगीकरण कक्ष सुरु करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावामध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहे. त्यानुसार तालुक्यातील ३२ गावांमध्ये विलगीकरण केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

खुर्च्यांचे वाटप

दापोली : के. के. व्हिएन्स वसुंधरा फाऊंडेशन या संस्थेतर्फे नवभारत छात्रालयास खुर्च्यांचे वाटप करण्यात आले आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी कृषी कार्याचा वसा घेऊन फाउंडेशन स्थापन केले आहे. छात्रालयात गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यांना हातभार लावावा यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

सिद्धी शिंदे यांची निवड

खेड : खेड तालुका युवती सेना अध्यक्षपदी सिद्धी अजित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांनी नियुक्तिपत्र दिले आहे. यावेळी पूनम जाधव, संजना कुडाळकर, राकेश सागवेकर, करण चव्हाण, सिद्धेश खेडेकर, विजय जाधव आदी उपस्थित होते.

व्हेंटिलेटरचे वितरण

रत्नागिरी : हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीतर्फे मिशन होप मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी सहा व्हेंटिलेटरची मदत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, हिंदुस्थान युनिलिव्हरचे अमोल आमटे उपस्थित होते.

परीक्षा शुल्क रद्द करावे

रत्नागिरी : कोरोनामुळे ऑनलाइन परीक्षा सर्व विद्यापीठांमार्फत सुरू आहेत. असे असतानादेखील विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण सुरू आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क रद्द करण्याची मागणी विद्यार्थी-पालकांमधून होत आहे.

ऑनलाइन नोंदणी बंद

रत्नागिरी : पी. एम. किसान सन्माननिधीसाठी नवीन ऑनलाइन रजिस्ट्रेशन गेले अनेक महिने बंद असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.