शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

सांडपाण्यावर घनगाळाचे मीठ खेड तालुका : लोटे - परशुराम औद्योगिक

By admin | Updated: February 15, 2016 01:19 IST

वसाहतीतील समस्या जटील; कारवाई काय?

आवाशी : लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या जखमेवर आता उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या घनगाळाचे मीठ चोळले जात आहे. त्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी अधिकच जटील होत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.संपूर्ण रासायनिक कारखानदारी म्हणून लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीचे नाव संपूर्ण राज्यभर आहे. मात्र, स्थापनेपासूनच सातत्याने उघड्यावर सांडपाणी सोडणे, सीईटीपीतून प्रक्रिया न करताच सोडलेल्या पाण्याने जलचर मृत होणे, पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतात सांडपाणी जाऊन शेत नापीक होणे, हवेतील प्रदूषणाने आरोग्य धोक्यात येणे, सुरक्षिततेचे नियम डावलल्याने कामगारांचा बळी जाणे अशा व इतर गोष्टींनी ही वसाहत सतत चर्चेत असते. मागील पंधरा दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या सीईटीपीत रासायनिक पाणी घेऊन जाणाऱ्या पाईपलाईनवरील चेंबर ओव्हर फ्लो होऊन संपूर्ण नाल्यातील रासायनिक पाणी उघड्यावर गेल्याच्या घटना दोनवेळा घडल्या. आश्चर्य म्हणजे ठिकाण एकच. ते म्हणजे रंग बनवणाऱ्या श्रेयस इंटरमिडीएट्स कंपनीलगत प्रथम घडलेल्या घटनेत ग्रामस्थांनी संबंधित कंपन्यांना विचारणा केली असता प्रथम हात वर करणाऱ्यांनी ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून कबूल केले. यामध्ये डॉ. खान केमिकल व वनवीड केमिकल या दोन कंपन्यांचा समावेश होता. मात्र, दोघांनीही याचा ठपका सीईटीपी व एमआयडीसीवर ठेवला. चार दिवसांनी प्रसिद्धी माध्यमांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. मात्र, त्यावर कारवाई काय झाली, याचे कुणाकडेही उत्तर नाही. ही जखम भरते न भरते तोच आता एमआयडीसीच्या ताब्यातीलच मोकळ्या असणाऱ्या योजना केमिकलसमोर रुपल इंडस्ट्रिज आणि मोप्रा कंपनीच्यामध्ये असणाऱ्या जागेवर घनगाळ, बॉयलरची राख व इतर रासायनिक कचऱ्याचे जणू काही डंपिंग ग्राऊंडच केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी घनगाळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.मात्र, एमआयडीसी व एमपीसीबीचे अधिकारी सातत्याने इकडे फिरत असताना त्यांच्या ह्या गोष्टी नजरेत का बरे येत नसाव्यात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे किंवा या दोघांचीच यामध्ये भागीदारी आहे की काय? असाही संभ्रम निर्माण होत आहे. अशाच प्रकारचा घनगाळ येथील नामांकित असणाऱ्या ए. बी. मौरी या कंपनीतून कोल्हापूरकडे पाठविण्याचे काम गेले महिनाभर सुरु आहे. मात्र, त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्य ती सुरक्षा नसल्याने तो घनगाळ परिसरातील रस्त्यांवर पडला होता. याचा त्रास अनेक दुचाकीस्वारांना झाला. त्यावेळी आवाशीतील काही ग्रामस्थांनी कंपनीला विचारणाही केली होती. मात्र, कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्यात आली. मात्र, कंपनीतील घनगाळ हा तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंटला पाठविणे बंधनकारक असताना तो कोल्हापूर येथे का पाठविला जात आहे.याबाबत कंपनी व्यवस्थापक पाटील यांनी आमच्याकडे तशी एमपीसीबीची परवानगी असल्याचे सांगितले. यावरूनच हे सिद्ध होत आहे की, साऱ्या समस्यांना कंपन्याऐवजी एमआयडीसी व एमपीसीबी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)विसर : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना बासनाततत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी जिल्हाभर सुरक्षा मोहीम राबवताना औद्योगिक वसाहतीत कागदाचा तुकडाही बाहेर दिसता कामा नये, असे बजावल होते. यात सर्व कारखानदार सहभागी होते. मात्र, त्यावेळी दिलेल्या वचनाचा त्यांना सोयीप्रमाणे विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वाहनांना सुरक्षा नाहीकंपनीच्या घनगाळाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्य ती सुरक्षा नसल्याने घनगाळ रस्त्यांवर पडत आहे. त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.रासायनिक कारखानदारी म्हणून औद्योगिक वसाहतीचे नाव.पंधरा दिवसापूर्वी नाल्यातील रासायनिक पाणी उघड्यावर.हात वर करणाऱ्या कंपनीसमोर ग्रामस्थांचा रूद्रावतार.एमआयडीसी व एमपीसीबी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.