शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर येथील पाखाडी कामाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: August 7, 2014 00:13 IST

चिपळूण पालिका : संदीप मोरे आणि कुटुंबीयांचा उपोषणाचा इशारा

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर परिसरातील पाखाडीचे काम करण्याकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने येथील रहिवासी संदीप मोरे व कुटुंबीयांनी १५ आॅगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मोरे यांनी यापूर्वी लोकशाही दिनात दि. २७ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी पाहणी करुन संबंधित तक्रारदारास बोलावण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. पाखाडीचे काम २ दिवसांत चालू करावे, अशी सूचना देण्यात आली. हे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून लेखी अहवाल कार्यालयाकडे कळविण्यात यावा, असेही सांगण्यात आले होते. मात्र, २६ जानेवारीपर्यंत हे काम न झाल्याने मोरे हे उपोषणास बसले होते. यावेळी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राचे वाचन केले व तुमचे काम दि. १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले. मात्र, हे काम अजूनही स्थितीत आहे. नगर परिषदेतील बांधकाम अभियंता भालचंद्र क्षीरसागर यांच्याकडे यासंदर्भात वारंवार विचारणा केली असता काम लवकरच चालू करुन देतो. दोन दिवस थांबा. उद्या येतो, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे मोरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले.सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य पद्धतीने मार्ग काढून ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत.या ठिकाणी अतिक्रमण वाढले असून, पाखाडीचे काम न झाल्यामुळे येथील रहिवाशांना अन्य सुविधा मिळू शकत नाहीत. एखादी व्यक्ती मृत झाल्यास मृतदेह उचलून नेण्यासही अडचण होत आहे. अग्निशमन बंब व रुग्णवाहिकाही या भागात येऊ शकत नाहीत. याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास मोरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याला संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही म्हटले आहे. (वार्ताहर)