शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

दमडीचाही खर्र्च नाही

By admin | Updated: January 13, 2015 00:08 IST

मग्रारोहयो : शेततळ्यांच्या कामाबाबत प्रशासकीय उदासीनता

रहिम दलाल - रत्नागिरी  -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतंर्गत जिल्ह्यात २४७ शेततळी बांधण्यासाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती़ शेततळ्यांच्या कामाकडे लक्ष दिल्यास ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात भासणारी पाणीटंचाई दूर होण्यास मोठा आधार मिळू शकतो़ मात्र, चालू आर्थिक वर्ष संपत आले तरी जिल्ह्यात शेततळ्याचे एकही काम करण्यात आले नसल्याचे म्हटले जात आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात कितीतरी पटीने पाऊस पडतो़ पावसाचे पाणी साठवण्याची कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने ते पाणी जमिनीवाटे नद्या, नाले, समुद्राला जाऊन मिळते़ पावसाचे पाणी साठवण्याच्या विविध उपाययोजना करता येऊ शकतात़ त्याबाबत सर्वच स्तरावर उदासीनता असल्याने शेततळ्यांच्या कामांकडे गांभिर्याने पाहिले जात नाही़ प्रशासकीय पातळीवरच शेततळ्यांच्या कामाबाबत उदासिनता असल्याचे दिसून येत आहे.या योजनेअंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन कामे मातीचे बांध, दगडी बांध, वनराई बंधारे, सामूहिक शेततळे, साठवण तलाव, भूमिगत बंधारे आदी कामे वृक्ष लागवड व शेतीसाठी घेण्यात येतात़ बारमाही शेती करण्याच्या दृष्टीने शेततळ्यांचा वापर करता येऊ शकतो़ त्यासाठी या योजनेच्या माध्यमातून ही कामे हाती घेण्यासाठी जिल्ह्यात २४७ शेततळीची कामे घेण्यात येणार होती़ त्यासाठी सन २०१४-१५ च्या आराखड्यामध्ये जिल्ह्यात २४७ कामांसाठी ३ कोटी ४२ लाख ९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़सर्वाधिक तळींची कामे खेड तालुक्यामध्ये ६७ एवढी करण्यात येणार होती.दरवर्षीप्रमाणे सन २०१४-१५ च्या मग्रारोहयोच्या आराखड्यामध्ये कोटीची उड्डाणे असली तरी सुमारे ४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, त्यामध्ये शेततळीच्या कामांवर दमडीही खर्च झालेली नाही. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाचा मग्रारोहयोचा आराखडाही कागदावरच राहणार असल्याचे चित्र आजच्या घडीला दिसून येत आहे.तालुकातळ्यांची कामेमंडणगड०१दापोली२१खेड६७चिपळूण६८गुहागर१२संगमेश्वर१६रत्नागिरी००लांजा२०राजापूर४२एकूण२४७