शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे नाव अबाधित राखण्यासाठी नाट्यगृहाची गरज

By admin | Updated: August 30, 2016 23:51 IST

गंगाराम गवाणकर : देवगड येथील केळकर महाविद्यालयात नाट्यशाखेचे उद्घाटन

देवगड : मराठी नाट्य चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी कोकणचे नाव उज्ज्वल केले आहे. हे नाव अबाधित राखण्यासाठी कोकणात नाट्यगृहाची गरज असून या नाट्यशाखेकडून ही गरज पूरी केली जाईल. नाटक हे माझे गोत्र व रंगमंच ही माझी कुलदेवता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेल २०१६-१७ चे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या देवगड कॉलेज नाट्यशाखेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. शिक्षण विकास मंडळ, देवगडच्या वतीने देवगड महाविद्यालयातील १९७५ साली सुरू करण्यात आलेली नाट्यशाखा पुनरूज्जीवित करण्यात आली. या नाट्यशाखेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी देवगड महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात गोवा राज्याचे माजी शिक्षणमंत्री व माजी प्राचार्य गोपाळराव मयेकर तसेच अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण विकास मंडळ देवगडचे अध्यक्ष जनार्दन तेली, सभापती तृप्ती पारकर, कार्यवाह प्रसाद पारकर, सहकार्यवाह प्रमोद नलावडे, संचालक वैभव बिडये, विश्वमित्र खडपकर, साक्षी महाडिक, अ‍ॅड. अमित जामसंडेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गोपाळराव मयेकर म्हणाले की, शिवधनुष्य उचलणे कठीण असते, परंतु, या शिवधनुष्याचा इंद्रधनुष्य होतो तेव्हा मनाला वेगळा आनंंद प्राप्त होतो. अशा प्रकारेच आपल्याकडून हा इंद्रधनुष्य तयार झालेला आहे. जगताना केवळ माणसाला पैसा पुरेसा नाही तर त्या सोबत आनंदही गरजेचा असतो. देवगडमध्ये मी प्राचार्यपदी हजर झालो तेव्हा मनोरंजनाचे काही साधन नव्हते. तसेच या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे देवगड एस. टी. स्टँड या ठीकाणी ‘एक शाम, रफिक के नाम’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला. त्यानंतर १९७५ साली महाविद्यालयात नाट्यशाखा सुरू केली. मनोरंजनाबरोबरच येथील गरजू विद्यार्थ्यांना व संस्थेला आर्थिक मदतीचा हातभार द्यावा हा त्यामागे उद्देश होता. तसेच सांस्कृतिक चळवळीपेक्षा माणसाला संस्कृती शिकवता यावी की, ज्यात माणसाच्या मन, बुध्दी व संवेदनाचा अंतर्भाव असावा, अशी भावना होती. यामुळे देवगड शिक्षण विकास मंडळाच्या तांत्रिक विकास शाखेचे संचालक अ‍ॅड. अमित जामसंडेकर यांची महाविद्यालयाच्या विकासातील जडत्व दूर करण्याची धडपड ही नक्कीच स्वागतार्ह असल्याचे मयेकर यांनी यावेळी सांगितले. या नाट्यशाखेकडून भरविण्यात येणाऱ्या एकांकिका स्पर्धेसाठी देण्यात येणारा फिरता करंडक रवींद्र मयेकर यांच्या नावे देण्याची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. या सूचनेचा संस्था व देवगड नाट्यशाखेच्यावतीने स्वीकार झाल्याची घोषणा संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद नलावडे यांनी यावेळी केली. जनार्दन तेली यांनी मयेकर यांना मानद प्राचार्य पद स्वीकारण्याची विनंती केली. माजी प्राचार्य मयेकर यांनीही या विनंतीचा स्वीकार करत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन गिरीष भिडे व सोनल उतेकर यांनी केले. आभार सोनल उतेकर हिने मानले. (प्रतिनिधी)