शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

मंडणगड नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या श्रुती साळवी

By admin | Updated: November 28, 2015 00:20 IST

उपनगराध्यक्षपदी श्रद्धा लेंडे : निवड बिनविरोध; मंडणगडमध्ये महिला राज

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या श्रुती साळवी यांची, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या श्रद्धा लेंडे यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. केवळ राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं महाआघाडीच्या वतीनेच दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्यात आल्याने शुक्रवारी निवडीची औपचारिकताच बाकी होती.दापोलीचे प्रांताधिकारी जयराम देशपांडे, तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत व्यापारी संकुलातील सचिवालयात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणूक झाली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी घोषित केले. यावेळी सर्व नगरसेवक, महाआघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी महाआघाडीच्या वतीने नगरपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रदेश काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप, आमदार संजय कदम, माजी आमदार चंद्रकांत मोकल, भाई पोस्टुरे, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, सिद्धार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, स. तु. कदम, मुश्ताक मिरकर, संतोष मांढरे, विजय पोटफोडे, रत्ना लेंडे, राजाराम लेंडे, वैभव कोकाटे, कादीर बुरोंडकर, संदेश चिले, सुनील घरटकर यांच्यासह महाआघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)महाआघाडीचा जोश मावळला, नाराजांचा बहिष्कार नगरपंचायत निवडणुकीदरम्यान महाआघाडीचा गवगवा होता. त्याकाळात महाआघाडीने घेतलेल्या सर्व कार्यक्रमांत आघाडीची एकजूट असल्याची प्रचिती येत होती. मात्र, शुक्रवारी महाआघाडीचा जोश मावळल्यासारखा दिसला. एरव्ही कोणत्याही कार्यक्रमात प्रचंड उत्साहात असणाऱ्या आमदारांची उपस्थितीबद्दलची नाराजी चेहऱ्यावर लपून राहिली नाही. दरम्यान, राष्ट्रवादीचे नाराज विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुकाध्यक्ष सुलतान मुकादम, युवक तालुकाध्यक्ष अनिल रटाटे यांनी शुक्रवारच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला. शिगवण समर्थकही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. हा गट नेमका कोणता, याचे गणित राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते कार्यक्रमाच्या ठिकाणी करताना दिसत होते.