शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

शेकापमधून लढण्यास राष्ट्रवादीनेच सांगितले

By admin | Updated: December 29, 2016 23:02 IST

रमेश कदम यांचा गौप्यस्फोट: चिपळुणात शक्तीप्रदर्शन

चिपळूण : लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विजय सोपा व्हावा, यासाठी पक्षानेच आपल्याला शेकापमधून लढण्यास सांगितले. त्याबदल्यात आपल्याला आमदारकी दिली जाणार होती. परंतु, नेत्यांनी तो शब्द पाळला नाही. माझे व माझ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करुन अस्तित्व संपवण्यापेक्षा इतर पक्षात गेलेले काय वाईट, असा सवाल माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. मात्र कोणत्या पक्षात जाणार, याबाबत मात्र त्यांनी अजून गुप्तता पाळली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व माजी प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. गुरुवारी त्यांनी राधाताई लाड सभागृह, चिपळूण येथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते.ज्या राष्ट्रवादीसाठी मी अहोरात्र झपाट्याने काम केले, ज्या पक्षाची पाळेमुळे तळागाळात घट्ट रोवली, त्या पक्षाकडून झालेला अन्याय किती सहन करणार? त्यामुळे आता यापुढे त्यांच्याकडून (आमदार भास्कर जाधव) पक्ष वाढवून घ्या. आपण जो पक्ष निवडू त्या पक्षात तुम्ही माझ्यासोबत असाल. मी जेथे जाईन तेथे प्रामाणिक राहीन. या पक्षातही प्रामाणिक होतो. परंतु, आपण जेथे जाऊ तेथे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही माजी आमदार कदम यांनी केले. (प्रतिनिधी)