शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

नवी फळी राजकारणात

By admin | Updated: October 16, 2015 00:06 IST

मंडणगड नगरपंचायत निवडणूक : सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला--रणसंग्राम

मंडणगड : मंडणगड नगरपंचायत प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची बनवल्याने सर्वजण यासाठी सक्रिय झाले आहेत. या निवडणुकीत राजकारणातील सर्व सुत्रांचा वापर होणार असल्याचे दिसत आहे़ शिवसेना, भाजपमध्ये युती न झाल्यामुळे अनेक प्रभागात काँग्रेस आघाडी, शिवसेना विरूद्घ भाजप हे प्रमुख तीन पक्ष समोरासमोर लढणार आहेत. बहुतांश प्रभागात मनसे व अपक्ष असे मिळून एकूण पाच पक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उमेदवार शोधणे कठीण बनले होते. त्याचबरोबर सूचक मिळणे कठीण बनले होते. मंडणगडच्या इतिहासात आजवर राजकारणात संबंध नसलेला तरूण वर्ग सक्रिय झालेला दिसत आहे. निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्ये तरूणांचे प्रमाण अधिक आहे. त्याच बरोबर सुशिक्षीत वर्ग अधिक असल्याचे दिसत आहे. २० ते ३० वयोगटातील १९ उमेदवार ज्यांचा याआधी कधीही राजकारणाशी संबंध नव्हता. ३१ ते ४० वयोगटातील २३ उमेदवार, ४१ ते ५० वयोगटातील १० उमेदवार, ५१ ते ६० वयोगटातील ३ उमेदवार, ६१ ते ७० वयोगटातील ३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या उमेदवारांपैकी सर्वांत कमी वय असणारा नवज्योतसिंग गौड हा २१ वर्षीय तरूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढत आहे. सर्वात ज्येष्ठ उमेदवार शशिकांत परकर यांचे वय ६७ वर्षे असून, ते भाजपकडून निवडणूक लढत आहेत. सर्वात सुशिक्षीत उमेदवार असलेला भाजप हा पक्ष असून, यामध्ये इयत्ता ११वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांपासून ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भाजपकडे १५ पैकी ५ उमेदवार पदवीधर आहेत, तर २ उमेदवार मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत़ बारावी शिक्षण झालेले ६ उमेदवार, तर दहावी व अकरावी झालेले २ उमेदवार आहेत़ भाजपने उभे केलेले उमेदवार हे राजकारणात नवे चेहरे आहेत़ काँग्रेस आघाडीने दिलेल्या उमेदवारांमध्ये शिक्षणातील कमी अधिकपणा अधिक आहे. त्यांच्याकडे चौथी ते एल. एल. बी. शिक्षण घेतलेले सर्व स्तरातील उमेदवार आहेत. राजकारणापासून दूर राहिलेल्या उपेक्षित धनगर समाजाला काँग्रसे महाआघाडीने यावेळी उमेदवारी दिली आहे. महाआघाडीने १७ उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये दोन पदवीधर, बारावीपर्यंत शिक्षण झालेले सहा, दहावी शिक्षण झालेले सात, दहावीपेक्षा कमी शिक्षण असलेले दोन उमेदवार आहेत. ऐन वेळेला गटातटाचे राजकारण बाजूला करून शिवसेना निवडणुकीला सामोरी जात आहे. १७ पैकी १६ उमेदवार उभे करता आले, ही सेनेची उणे बाजू ठरते. शिवसेनेने उभे केलेल्या उमेदवारामंध्ये ४ उमेदवार पदवीधर आहेत. बारावी शिक्षण घेतलेले चार, तर दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले ८ उमेदवार आहेत. यावेळी शिवसेनेमधून शहरप्रमुखांसह सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यही नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा अनुभव घेऊन उभे आहेत़ अपक्ष म्हणून सहा उमेदवार उभे आहेत. हे उमेदवारही सुशिक्षित व तरूण आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीने शहरातील राजकारण बदलत आहे. जुन्यांबरोबर आता नवी फळी राजकारणात आणि शहर विकास प्रक्रियेत स्वत:हून पुढे येत आहे, याचा शहरवासीयांना अभिमान आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत सक्रिय होत तरूण पिढीने राजकारणात उडी घेतली आहे. त्याचबरोबर विकासकामांमध्ये नव्या पिढीकडून राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत़ (प्रतिनिधी)तरूण सक्रिय : सर्वात कमी वयाचा उमेदवारमंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सारे पक्ष तयार झाले आहेत. जुन्या जाणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आपण सक्रीय असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, यापूर्वी कधीही राजकाणात सहभागी न होणाऱ्या तरूणवर्गाने या निवडणुकीत सक्रीय सहभाग दर्शवला आहे. निवडणुकीच्या रिंगणात तरूणवर्ग अधिक असून, सुशिक्षित वर्गदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मंडणगडच्या इतिहासात तरूणांनी सहभाग घेतलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. या निवडणुकीत सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून नवज्योतसिंग गौड आहे. २१ वर्षाचा नवज्योतसिंग याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.शिक्षित उमेदवारसर्वसाधारणपणे कोणत्याही निवडणुकीत शिक्षित उमेदवारांची संख्या तुलनेने कमी असते. मात्र, मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत चित्र वेगळेच दिसत आहे. या निवडणुकीत शिक्षित उमेदवारांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे.