शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आडिवरे येथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

By admin | Updated: October 13, 2015 00:17 IST

राजापूर तालुका : जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर; नऊ दिवस मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप

जैतापूर : नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेल्या राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थानतर्फे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील श्रीदेवी महाकालीची महती सर्वदूर पोहचल्याने तिच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. जिल्ह्यात आडिवरे येथे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. नऊ दिवस या परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. कोल्हापूर, सांगली, सातारा, गोवा याठिकाणचे भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीची महती सर्वदूर पोहचल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नवरात्रीनिमित्त मंदिरात साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते. यानिमित्त पहिल्या दिवसापासून दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत पूजापाठ, अभिषेक व महानैवेद्य, दुपारी ३ वाजता आरती, दुपारी ३.३० ते ५.३० ह. भ. प. विलास शहाणे (नाटे) यांचे कीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता धुपारती, त्यानंतर प्रवचनकार किरण जोशी (रत्नागिरी) यांचे प्रवचन, रात्री ९ वाजता अरविंद पिळगावकर (मुंबई) यांचे गायन, रात्री १० वाजता पालखी प्रदक्षिणा होईल.या कार्यक्रमांबरोबरच १३ रोजी रात्री १२ नंतर कीर्तन, १४ रोजी रत्नागिरी येथील ‘उत्सव कलागुणांचा’ हा कार्यक्रम, गुरुवारी ‘घरटे तुझे नी माझे’ हे कोंभे येथील कलाकारांनी सादर केलेले नाटक, १६ रोजी कोल्हापुरातील ‘झंकार’ हा आॅर्केस्ट्रा, १७ रोजी कशेळी येथील कलाकारांचे ‘व्यंकोजी वाघ’ हे नाटक, १८ रोजी कालिकावाडी येथील कलाकारांचे ‘देवा घरचा न्याय’ हे नाटक सादर होणार आहे.१९ रोजी गावडेआंबेरे येथील कलाकार ‘रंग उमलत्या मनाचे’ हे नाटक सादर करतील. २० रोजी रसिकराज, वाडापेठचे ‘कुणी तरी आहे’ हे नाटक तर २१ रोजी मांडेश्वर उत्साही नमन मंडळ, नवेदर यांचे नमन होईल. या कार्यकमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाकाली मंदिर ट्रस्ट, आडिवरेचे अध्यक्ष विश्वनाथ शेट्ये यांनी केले आहे. आडिवरे येथे येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी रत्नागिरी एस. टी. डेपो, देवगड एस. टी. डेपो आणि राजापूर एस. टी. डेपो येथून जरूरीप्रमाणे जादा गाड्या सोडल्या जातात. जैतापूरच्या नवीन पुलामुळे मालवण, देवगड आणि विजयदुर्ग कडील यात्रेकरूंची सोय झाली आहे. आडिवरे येणाऱ्या भक्तांनी गाड्या पार्किंग करणे, देवी दर्शन घेणे, मौजमौजा करणे आणि स्वच्छता याबाबत योग्य तो संयम व शिस्त पाळावी आणि देवस्थान, स्वयंसेवक आणि पोलीस यांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)राजापूर तालुक्यातील आडिवरे हे ठिकाण प्रति कोल्हापूर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिर परिसरात श्रीदेवी महाकाली, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी महासरस्वती, श्रीदेव रवळनाथ आणि श्री नगरेश्वर अशी विविध देवतांची मंदिर आहेत. त्यामुळे पंचायतन मंदिर म्हणूनही या परिसराची ओळख निर्माण झाली आहे. श्रीदेवी महाकालीच्या मंदिराची नव्याने बांधकाम केले असून, यावर्षी याठिकाणी भक्तांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे.