शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत वादावादी, लवकरच बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

रत्नागिरी : राष्ट्रवादीच्या रत्नागिरी शहराध्यक्ष नियुक्तीवरून वाद सुरू झाला असून, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ...

रत्नागिरी : राष्ट्रवादीच्या रत्नागिरी शहराध्यक्ष नियुक्तीवरून वाद सुरू झाला असून, ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी दोन मतदारसंघांत राष्ट्रवादीचे आमदार झाले. २०१९ साली उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे रत्नागिरीतील राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यानंतर ती वाढलेली नाही. जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी २०१९ मध्ये शहराध्यक्ष पदी तरुण कार्यकर्ते नीलेश भोसले यांची नियुक्ती केली. दोन वर्षे शहराध्यक्ष म्हणून पक्षाच्या उपक्रमात ते सहभागी होत आहेत. मात्र, त्यांच्या आधीचे शहराध्यक्ष अभिजित तथा मनू गुरव यांनी अजूनही आपणच शहराध्यक्ष असल्याचे सांगितले. तेथून हा वाद सुरू झाला आहे.

सोमवारी ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब समोर आणली. नगर परिषद निवडणुकीसाठीच्या समितीत मिलिंद कीर यांचे नाव निश्चित झालेले असतानाही वगळण्यात आले. पक्षात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी चर्चा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याशी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर परिषद निवडणुका लक्षात घेऊन मिलिंद कीर यांच्याकडे काही जबाबदारी सोपवण्याचा विचार पक्षाकडून केला जात आहे. मात्र, काही मंडळी त्यात मोडता घालत आहेत. हा मुद्दाम फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

त्यांनी केलेल्या या आरोपांना ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी जोरदार उत्तर दिले आहे. पक्षात फूट पाडणाऱ्यांवर कारवाई करा, असे कुमार शेट्ये यांनी म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. याआधी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे यांना ज्यावेळी काँग्रेसमध्ये विधानसभेची उमेदवारी दिली गेली, त्यावेळी कुमार शेट्ये यांनीच बंडखोरी केली होती. उमेश शेट्ये यांच्या नगराध्यक्ष निवडणुकीतही त्यांनीच पक्षाविरुद्ध काम केले आहे, असेही राजाभाऊ लिमये यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनाच पक्षातून काढून टाका, अशी मागणी राजाभाऊ लिमये, प्रदेश सदस्य बशीर मुर्तुझा, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे. मर्जीतील लोकांना पदे मिळवून देण्यासाठी कुमार शेेट्येच पक्षात फूट पाडत असल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी प्रदेश कार्यालयाकडे केली जाणार आहे.

.................

लवकरच बैठक

रत्नागिरीत निर्माण झालेल्या या वादाबाबत लवकरच बैठक घेण्याची भूमिका जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी घेतली असल्याचे समजते. येत्या चार दिवसांत रत्नागिरीत बैठक घेऊन या दोन्ही बाजूच्या लोकांना एकत्र बोलावून हा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.

...................

नेते भांडणात मश्गुल

मुळात पक्षाची ताकद घटलेली असताना आणि महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेने राष्ट्रवादीला सोबत घेतलेले नसताना पक्ष वाढवण्यावर भर देण्यापेक्षा नेतेमंडळी आपापसात भांडत आहेत. त्यामुळे उरलेसुरले कार्यकर्तेही संभ्रमित झाले आहेत, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.