शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाना कलांनी प्रेक्षक भारावले

By admin | Updated: February 23, 2015 00:24 IST

विविध कलागुण: ढालकर यांनी रंगवला जादूमयी कार्यक्रम

गुहागर : गुहागरमधील व्याडेश्वर देवस्थानच्यावतीने आयोजित रंगतरंग या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात हास्यसम्राट श्रीकांत ढालकर यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढले. तोंड न उघडता गायन केले व फणीच्या सहाय्याने विविध आवाज काढून गाणी सादर केली, अशा अनेक कला सादर करून त्यांनी प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.कार्यक़्रमाच्या सुरुवातीला देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, उपाध्यक्ष प्रकाश भावे, सचिव सुहास आठवले, खजिनदार अनिकेत गोळे यांनी श्रीकांत ढालकर व सहकाऱ्यांचा सत्कार केला. गणपतीचे गाणे गात गात काही मिनिटात ढालकर यांनी गणेशाचे चित्र रेखाटले. दयाळ पक्षी बुलबुल, भारद्वाज, खंड्या, सुतारपक्षी, सुबग, कहुवा गोपी आदी विविध पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढत या पक्ष्यांच्या सवयींबद्दल माहिती दिली.फणीचा वापर करुन विशेष धून निर्माण करुन हात नका लावू माझ्या साडीला असे सू काढले. तुतारीचा आवाज, चादणं घाली रात अशी एकापेक्षा एक गाणी सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महिला व पुरुषांचा आवाज गाणी म्हटली एवढ्यावरच न थांबता चक्क हसता हसता गाणी सादर केली. शेवटच्या दहा मिनिटांत शाडूच्या मातीची गणेशमूर्ती साकारली. यावेळी ओंकार बडवे याने उठ पंढरीचा राजा, दत्त माझा मी दत्ताचा, गाणी सादर केली. आॅरगन राजेश मोरे व ढोलकी राहुल बडवे यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)