शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कबड्डी स्पर्धेत नम्रता प्रतिष्ठान विजयी

By admin | Updated: November 11, 2014 23:17 IST

जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात चिपळूणच्या न्यू हिंद विजय संघावर १ गुणाने मात

चिपळूण : संघर्ष क्रीडा मंडळ कालभैरव देवस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात चिपळूणच्या न्यू हिंद विजय संघावर १ गुणाने मात करुन मंडणगडचा नम्रता प्रतिष्ठान हा संघ विजेता ठरला. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कुलभूषण कुलकर्णी याला गौरविण्यात आले. अंतिम सामना चिपळूणचा न्यू हिंद विजय व मंडणगडचा नम्रता प्रतिष्ठान यांच्यामध्ये झाला. मध्यंतरापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात न्यू हिंद विजय ६ गुणांनी आघाडीवर होता. मात्र, ही आघाडी न्यू हिंद विजय संघाला शेवटपर्यंत टिकविता आली नाही. राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या कुलभूषण कुलकर्णी, चंद्रकांत घाणेकर, शेखर तटकरे यांनी अनुभवाच्या जोरावर न्यू हिंद विजय संघावर बाजी पलटवली. कुलभूषणने एका चढाईत ३ खेळाडू बाद करून न्यू हिंद विजयवर एक लोन चढविण्याची भूमिका बजावली. त्यानंतर शेवटच्या ५ मिनिटात रंगतदार सामना झाला. अखेर थरारक लढतीत नम्रता प्रतिष्ठानने एक गुणाने सामना जिंकला. सौरभ नाटुस्कर याने उत्कृष्ट पकड करीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली. स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दोन्हीही लढती एकतर्फी झाल्या. यामध्ये नम्रता प्रतिष्ठानने आंतरराष्ट्रीय खेळाडू शैलेश सावंतच्या खेळावर गजानन संघाचा ३२-१९ असा पराभव केला. न्यू हिंद विजयने दसपटी क्रीडा मंडळाचा ३१-१५ गुणांनी पराभव केला. या सामन्यात अभिषेक भोजनेने खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन घडविले. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुलभूषण कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट चढाई म्हणून अभिषेक भोजने, तर सर्वोत्कृष्ट पकड म्हणून सौरभ नाटुस्कर यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेतील बक्षीस वितरण जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कदम, राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य रवींद्र देसाई, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष बाबू तांबे, प्रताप शिंदे, नगरसेवक सुचय रेडीज, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शिवसेना विभागप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक राजेश कदम, उत्तम जैन, माजी नगरसेवक विजय चितळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले यांच्या उपस्थितीत झाले. (वार्ताहर)संघर्ष क्रीडा मंडळाने ३३व्या वर्षात पदार्पण केले असून, या मंडळाने मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भरविण्याचा मान मिळविला असून, त्या यशस्वीही केल्या आहेत. मंडळातर्फे व्यायामशाळा बांधण्याचा संकल्प असून, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार रमेश कदम यांनी केले.