शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

नामफलक मराठीत हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

रत्नागिरी : धर्मादाय आयुक्तांच्या १० एप्रिलच्या परिपत्रकानुसार, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी झालेल्या संस्था आणि न्यासाने मराठी भाषेमध्ये नामफलक ...

रत्नागिरी : धर्मादाय आयुक्तांच्या १० एप्रिलच्या परिपत्रकानुसार, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी झालेल्या संस्था आणि न्यासाने मराठी भाषेमध्ये नामफलक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या परिपत्रकानुसार हे आदेश देण्यात आले आहेत. येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

गणेश विसर्जनाला मनाई

दापोली : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन गिम्हवणे गावातील तेलीवाडी येथील तलावात केले जाते. मात्र, यावर्षी या तलावाचे राज्य सरोवर संवर्धनातून सुशोभिकरण सुरु आहे. त्यामुळे गिम्हवणे ग्रामपंचायतीने यावर्षी शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन या तलावात करु नये, असे निवेदन दापोली नगर पंचायतीला दिले आहे.

निराधारांना आधार

लांजा : येथील भाकर संस्थेने कोरोना काळात मृत्यू झालेल्या १६० व्यक्तींच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. राजापूर, लांजा, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यांमधील कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींची यादी संस्थेने शासकीय यंत्रणेकडून संकलित केली आहे. पुणे येथील सेवा सहयोग फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने या कुटुंबीयांना मदत करण्यात आली.

आयटीआयमध्ये प्रवेश

दापोली : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २०२१ सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या संस्थेत एक वर्षाचा ड्रेस मेकिंग, वेल्डर, डिझेल मेकॅनिक (१० वी उत्तीर्ण) आणि दोन वर्षांचा इलेक्ट्रिशियन आणि फिटर हे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

पंच मंडळ अध्यक्षपदी निवड

खेड : मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे मुख्य कार्यवाह आणि तालुक्यातील आंबये गावचे सुपुत्र विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या पंच समितीचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

रस्ता खचला

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील वीर देवपाट गावातील मोगरीवाडी येथील रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्यामुळे मोगरीवाडी, घेवडेवाडी, शिगवणवाडी आणि बंदरवाडी अशा वाड्यांच्या दळणवळणाची गैरसोय झाली आहे. वाहतूक पूर्णत: बंद झाल्याने या वाड्यांना एकमेकांशी अथवा इतरत्र संपर्क करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत आहे.

कुमठेकर यांचा सत्कार

देवरुख : महावितरण कंपनीच्या मानव संसाधन विभागात लिपिक पदावर कार्यरत असलेले अशोक कुमठेकर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा येथील दत्तनगर बालमित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. कुमठेकर यांनी शरीरसौष्ठव, अ‍ॅथलेटिक्स, ट्रेकिंग, स्विमींग, सायकलींग, मल्लखांब, मूर्तीकाम आदी खेळांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले आहेत.

वेदश्री कारेकर प्रथम

गुहागर : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवलीचा निकाल यावर्षीही उल्लेखनीय लागला आहे. वेदश्री कारेकर हिने ९०.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शाळेतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याने ग्रामस्थ, पालकांनी शाळेचे कौतुक केले आहे.

विद्यालय आपल्या दारी

दापोली : तालुक्यातील टाळसुरे महाविद्यालयाने यापूर्वीच विद्यार्थ्यांना इंटरनेटबाबत येणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून विद्यालयामार्फत मोफत वाचन सुविधा सुरु केली आहे. त्याचबरोबर आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कनेक्टिव्हिटी नसणे, मोबाईल नसणे किंवा रिचार्ज करण्यात अडचणी येत असल्याने यावर उपाय म्हणून ‘विद्यालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे.

कोरोना लसीकरण

देवरुख : येथील ग्रामीण रुग्णालयात एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. यात ३१ जणांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा एड्स नियंत्रण पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील आणि येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. अंगरीश आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली हे लसीकरण करण्यात आले.