शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

दापोलीतील हर्णै समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील दोन पर्यटकांवर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 10:18 IST

शुभम परदेशी, सुरज काळे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला.

दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करण्याच्या वादावरून पुण्यातील  दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

दापोलीतील हर्णै समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना रविवारी सायंकाळी घडली. शुभम परदेशी (वय २९), सुरज काळे (वय २५) अशी हल्ला झालेल्या जखमी तरुणांची नाव आहेत. हे दोन्ही तरुण पिंपरी चिंचवड येथील राहणारे आहे. पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्णै समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. रविवारी ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याचवेळी सुराली गार्डन जवळ एक इनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला करं, असे सांगितले. आपल्याला गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला. शुभम परदेशी, सुरज काळे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. तसेच गाडीची काचही फोडण्यात आली. या घटनेनंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

या दोन्ही पर्यटकांवर खुनी हल्ला करणारे सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.