रत्नागिरी : राज्यातील दहा नगरपरिषदांमधील १६ रिक्त जागांसाठी १० जानेवारी २०१६ रोजी मतदान होणार आहे. यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ अ चा समावेश आहे. उमेश शेट्ये यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. चार जागांच्या पोटनिवडणुकीप्रमाणे या एका जागेसाठीही शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची लढाई होणार असल्याचे चित्र आहे. गुरुवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी नवनिर्मित २ नगरपरिषदा, १८ नगरपंचायतीच्या आणि १० नगरपरिषदांमधील रिक्त १६ जागांसाठी कार्यक्रम जाहीर केला.१ नोव्हेंबर २०१५ रोजी रत्नागिरीतील चार जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. त्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीत जोरदार चुरस होती. अखेर प्रत्येकी दोन जागांवर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना यश मिळाले होते. या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत नगरसेवक असलेले उमेश शेट्ये यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. (प्रतिनिधी)कार्यक्रम जाहीर करणे ८ डिसेंबरअर्ज देणे व स्वीकारणे १० ते १७ डिसेंबरछाननी - १८ डिसेंबरअर्ज माघारी - २८ डिसेंबरयादी प्रसिद्धी - ४ जानेवारीमतदान - १० जानेवारीमतमोजणी - ११ जानेवारी.जागा रिक्त ठेवणेच हिताचे?रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला दहा महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी पैसा व वेळ वाया घालविणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही निवडणूक लढविण्याऐवजी जागा रिक्त ठेवावी व सार्वत्रिक निवडणुकीलाच सामोरे जावे, अशीही चर्चा सुरू आहे.
नगरपरिषद पोटनिवडणूक १० जानेवारीला
By admin | Updated: December 5, 2015 00:22 IST