शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्ह्यात बहुरंगी लढती

By admin | Updated: February 13, 2017 23:12 IST

४९१ उमेदवार रिंगणात : जि.प.साठी १७५, पं.स.साठी ३१६ उमेदवार

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीतून तब्बल १५१ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी १७५ उमेदवार तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ३१६ असे एकूण ४९१ उमेदवार निवडणूक रणसंग्रामात उतरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदमधून ५१ तर पंचायत समिती निवडणुकीतून १०० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या १ ते ६ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत विक्रमी ६५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत जिल्हा परिषदेचे ५ तर पंचायत समितीचे ६ उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले होते. या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठी २२६ तर पंचायत समितीसाठी ४१६ उमेदवार रिंगणात होते. तर १३ फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोण कोण उमेदवार निवडणूक रिंगणातून माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हा परिषदेच्या २२६ उमेदवारांपैकी ५१ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १७५ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४१६ उमेदवारांपैकी सोमवारी १०० उमेदवारांनी माघार घेतल्याने ३१६ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या प्रमुख पक्षांसह जनता दल, अपक्ष, बंडखोर उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. (प्रतिनिधी)काँग्रेससह शिवसेना, भाजपात बंडखोरीजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील शिवसेना आणि भाजपमधील काही जागांवरील बंडखोरी कायम राहिली आहे. यात प्रकर्षाने काँग्रेसमध्ये कणकवली तालुक्यातील फोंडा, कुडाळ तालुक्यातील नेरूर तर शिवसेनेमध्ये कुडाळ तालुक्यातील माणगाव, भाजपमध्ये पिंगुळी मतदारसंघात, कणकवली तालुक्यातील कासार्डे मतदारसंघात बंडखोरी कायम राहिली आहे.आजपासून प्रचाराचा धुरळा उडणार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १३ रोजी संपून चित्र स्पष्ट झाले आहे. आता उद्या दि. १४ पासून १९ पर्यंत सहा दिवस प्रचारासाठी अवधी मिळणार आहे. त्यामुळे दिवसरात्र करुन ग्रामीण भाग पिंजून काढला जाणार आहे.मुख्यमंत्री बुधवारी कुडाळातराज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा कुडाळ येथील एस. टी. महामंडळाच्या ग्राउंडवर होणार आहे. या सभेची भाजपाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री या सभेत शिवेसेनेला की, नारायण राणे यांच्यावर ‘प्रहार’ करणार याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. ंं