शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सुविधा वापरण्यासाठी महावितरणचे ग्राहकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:29 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक वीजबिल भरणा केंद्रावर जाणे टाळतात. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने महावितरण कंपनीने सर्व प्रकारच्या ...

रत्नागिरी : कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहक वीजबिल भरणा केंद्रावर जाणे टाळतात. कोरोना संसर्गाचा धोका असल्याने महावितरण कंपनीने सर्व प्रकारच्या ऑनलाइन सुविधा सुसज्ज ठेवल्या आहेत. जिल्ह्यातील वीज ग्राहकही मोठ्या प्रमाणात मोबाइल अ‍ॅप आणि ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा वापरत असून, सद्यस्थितीत ग्राहकांनी मोबाइल अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेले वर्षभर सर्व जनता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लढत आहे. लॉकडाऊन काळातही नागरिकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी, दवाखाने, पाणीपुरवठा, दिवे आणि अन्य सुविधा सुरू ठेवण्यासाठी वीज कर्मचारी अविरत काम करत आहेत. बाधित क्षेत्रातही वीजपुरवठा अविरत सुरू ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जिवाची पर्वा न करता कार्यरत आहेत.

महावितरण कंपनीच्या सुधारित मोबाइल अ‍ॅपमध्ये ग्राहकांना वीजदेयक पाहता तसेच भरणा करता येते शिवाय अ‍ॅपद्वारे नवीन वीज जोडणी अर्ज, नावातील बदलासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बाधित क्षेत्र असल्याने वीज मीटर रीडिंग घेणे शक्य होत नाही, अशा परिस्थितीत महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना मीटर रीडिंग पाठविणे शक्य झाले आहे. आपले चालू वीज देयक, मागील देयके, भरणा इतिहास, बिल भरण्याची सुविधा तसेच अनेक सुविधा मोबाइल अ‍ॅपमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच महावितरण कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १९१२, १८००२३३३४३५, १८००१०२३४३५ याद्वारे ग्राहक आपली समस्या नोंदवू शकतात, अथवा www.mahavitaran.in मधील सर्व प्रकारच्या ऑनलाइन पद्धतीने सुविधांचा लाभ घेऊन प्रत्यक्ष संपर्क टाळावा, शक्यतो कार्यालयात प्रवेशासाठी आग्रह करू नये तसेच आपले वीज देयक वेळेवर ऑनलाइन पद्धतीने भरणा करावे व कोरोना विरोधाचा लढा यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी केले आहे.