शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

डोंगरची काळी मैना अस्तित्व दाखवतेय!

By admin | Updated: April 7, 2015 01:29 IST

संवर्धन करा : वृक्षतोडीचा फटका करवंदाच्या जाळींनाही बसतोय...

जाकादेवी : जाकादेवी परिसरातील डोंगराळ भागात डोंगरची काळी मैना करवंदीच्या झुडपांवर अस्तित्व दाखवू लागली आहे. काही दिवसातच ही डोंगरची काळी मैना रानमेवा म्हणून खवय्यांना उपलब्ध होईल.वेगवेगळ्या कारणानी लोकांनी केलेली वृक्षतोड त्याचबरोबर झुडुपांच्या तोडीत करवंदीचे प्रमाण जंगलातून कमी होताना दिसते आहे. करवंदीच्या काट्यांमुळे ती नकोशी होत असतानाच शेताला, बागेला कुंपण करण्यासाठी त्याचा जो वापर आजही होतोय त्यामुळे करवंंदीचे प्रमाण झपाट्याने कमी होताना दिसते आहे. वनस्पतीच्या तोडीने करवंदांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने पुढे बिकट परिस्थिती उद्भवू शकते.करवंद एप्रिल आणि मे महिन्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतात. आंबट - मधूर गोड लागणारी करवंद आलेल्या हंगामात सेवन करणे प्रकृतीच्या दृष्टीने लाभदायक असते. पिकलेली करवंद खाल्ली जातात. त्याचबरोबर करवंदाचे सरबतही केले जाते. करवंदे पिकली की ती सुकवून त्याचा बेदाण्यासारखा उपयोग केला जातो. पिक्की करवंदे बिया काढून त्यांना मीठ लावून सुकवून ठेवली जातात व खाल्ली जातात. कच्च्या करवंदांचे अलिकडच्या काळात लोणचे मोठ्या प्रमाणात केले जाते. झाडाला आलेली करवंद शिजवून ती वस्त्रगाळ करुन काढलेल्या रसात इसेन्स टाकून सरबत केले जाते किंवा सरबत करण्यासाठी रस बाटलीत भरुन ठेवला जातो.कमी होत चाललेला हा करवंद रानमेवा टिकवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. (वार्ताहर)जाकादेवी परिसरात करवंद मुबलक प्रमाणात विक्रीला येण्यास काही दिवसांचा अवधी आहे. मात्र, ग्रामीण परिसरात करवंदांच्या जाळीकडे व्यावसायिकांचे लक्ष लागलेय. हंगामी उत्पन्न देणारी ही काळी मैना आहे. कातळ साफ करण्याच्या नादात निसर्गदत्त संपत्तीकडे कानाडोळा होतोय. वृक्षतोडीचा फटका या वनस्पतीलाही बसतोय. करवंदाचा उपयोग आता वाईनसाठीही होऊ लागल्याने त्याचे महत्व वाढलेय.विविध उपयोगी करवंद राखायला हवे. कोकणात पर्यटक समुद्र सफर करण्यासाठी येत असले तरी आता ग्रामीण पर्यटनाचा ओढाही वाढू लागला आहे. गावोगाव त्या भागातील भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला गेला तेव्हा करवंदांच्या झाडीची तोड मोठ्या प्रमाणावर होत असताना पाहायला मिळतेय. कोकणची ही निसर्गसंपदा टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला तर त्याला महत्व प्राप्त होणार आहे.