शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

मोरेवाडीला पुन्हा धोका

By admin | Updated: June 25, 2015 23:26 IST

खेड तालुका : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाला हरताळ

खेड : डोंगराळ भागात वसलेल्या नातूनगर गावातील मोरेवाडी येथे राहणाऱ्या १५ घरातील लोकांना नजीकचा डोंगर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी या घरांवर मोठमोठे दगड पडले होते. या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.या घरांसाठी संरक्षण भिंत बांधावयाचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र आजतागायत या भिंतीचे काम करण्यात आले नाही. या घरांवर आता पुन्हा डोंगर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींसह आमदारही सुस्तावल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत खेड येथील प्रभारी तहसीलदार रवींद्र वाळके यांच्याशी संपर्क साधला असता संरक्षक भिंत बांधण्याचे काम दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्यक्ष हे काम सुरूच झाले नसल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचा हा बनाव लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.गेल्यावर्षी या घरांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत बांधून देण्याचे निश्चित केले होते. याबाबत खेडचे प्रभारी तहसिलदार रवींद्र वाळके यांनीही चार-पाच दिवसात ही भिंत बांधणार असल्याचे सुतोवाच केले होते. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतरही या भिंतीबाबत कोणीही बोलण्यास पुढे येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नातूनगर धरणामुळे या वाडीचे पुनर्वसन करून त्यांना डोंगराळ भागात घरे बांधण्यासाठी प्लॉट देण्यात आले.या ठिकाणी घरे बांधल्यानंतर प्रशासनाने त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. गेली दोन वर्षे सातत्याने तेथील ग्रामस्थांनी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, या सर्व मागण्या धुडकावण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या वाडीला लागूनच डोंगर असल्याने तेथील माती आणि दगड या घरांवर पडण्याची भीती ग्रामस्थांनी वर्तवली आहे. गेले ४ दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ही मोठी दरड पडण्याची भीती व्यक्त होत आहे. ती कोसळण्याच्या अगोदरच तेथे तातडीने संरक्षक भिंतीचे काम सुरू करावे, अशी मागणी नातूनगर मोरेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)कोणतीच कार्यवाही नाही...खेड तालुक्यातील नातूनगर गावात असलेल्या मोरेवाडीतील १५ घरांना सध्या धोका आहे. गतवर्षी या घरांवर दगड कोसळले होते. असे असतानाही यंदा प्रशासनाने त्यांच्याबाबत कोणतीही काळजी घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण पावसाळा या वाडीतील कुटुंबांना जीव मुठीत धरून काढावा लागणार आहे. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा मुद्दा किती गांभीर्याने हाताळला आहे, याचे हे उदाहरण आहे. गेल्या नऊ महिन्यात यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.