शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

बारा वर्षात वाढले तब्बल दीड लाख ग्राहक

By admin | Updated: February 25, 2015 00:13 IST

महावितरण कंपनी : महसुली उत्पादनातही झाली अडीचपट वाढ

मेहरून नाकाडे-  रत्नागिरी   जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी इमारतींची संख्या वाढत असल्याने नवीन घरांसाठी विजेच्या मीटरची मागणी वाढत आहे. २००२ साली जिल्ह्यातील वीज ग्राहकांची संख्या ३ लाख ६५ हजार २५० इतकी होती. २०१४ अखेर वीज ग्राहकांची संख्या ४ लाख ५७ हजार ४२८ इतकी झाली आहे. गेल्या बारा वर्षात १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असलेली दिसून येत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये महावितरणचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अपार्टमेंटसची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात सन २००२ मध्ये घरगुती ग्राहक ३ लाख २५ हजार ५२१, कृषिपंप १०,७८१, औद्योगिक ५४२५, सार्वजनिक पथदीप ८१८, तर अन्य ग्राहक १२६० इतके होते. २०१४मध्ये ही संख्या वाढलेली दिसून येत आहे. २०१४ मध्ये घरगुती ग्राहक ४ लाख ४ हजार ६९९, वाणिज्य २८ हजार २०३, औद्योगिक ५५३७, कृषिपंप १२९५, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे २०८३ ग्राहक आहेत. १ लाख ३१ हजार ९०७ इतके ग्राहक बारा वर्षात वाढलेले दिसून येत आहेत. ग्राहकांकडून वीज मीटरची मागणी वाढत असल्यामुळे २००२मध्ये जिल्ह्याला १४७ मेगावॅट इतकी वीज लागत असे. परंतु आता जिल्ह्याला १८० ते १८५ मेगावॅट इतकी वीज लागत आहे.वीज ग्राहक वाढल्यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलातही वाढ झालेली दिसून येत आहे. सन २००२मध्ये वर्षाला १७० कोटी असलेला महसूल आता ४९८ कोटी इतका झाला आहे. एकूणच महावितरणचा विस्तार वाढत असल्याचे दिसून येत आहे.सेकंड होम्स्च्या संकल्पनेमुळे जिल्ह्यात घरांची संख्या वाढत आहे. घरे वाढल्यामुळे वीज ग्राहकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्षाला साडेतीन ते चार हजाराने ग्राहकांची संख्या वाढत आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.महावितरणकडून महिन्याला वीजबिल देण्यात येत असल्याने दरमहा आॅनलाईन, एटीपी तसेच वीजबिल केंद्रावर वीजबिल भरले जाते. त्यामुळे महावितरणचा दरमहा कोट्यवधीचा महसूल गोळा होतो. वीजबिल थकबाकीदारांवर कारवाई करताना वीजपुरवठाच खंडित केला जातो. शिवाय ग्राहकांकडून दंडही वसूल केला जातो. मार्चअखेरीस वसूली पूर्ण करण्यासाठी तर खास पथक कार्यरत असते.शेतीपंपाची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कृषिपंपाचे १४ हजार ७२४ इतके ग्राहक आहेत. २००२ ते २००७ पर्यंतची कृषिपंपाची आकडेवारी महावितरण कंपनीकडून उपलब्ध झालेली नाही. मात्र, २००८पासून शेतीपंप जोडणी मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्याचे दिसून येते.वर्ष जोडण्या२००८११८३८२००९३८०२०१०३९३२०११४१४२०१२६२८२०१३५४५२०१४७९२