शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संभाजी ब्रिगेडतर्फे विधानभवनावर मोर्चा

By admin | Updated: December 5, 2014 23:35 IST

विविध मागण्या : प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले यांची माहिती

चिपळूण : मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडतर्फे मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ८ रोजी विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले यांनी पत्रकारांना दिली. मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय राज्यपालांचा अध्यादेश काढून राज्यात लागू केला होता. परंतु, या निर्णयावर उच्च न्यायालयाकडून स्थगिती आली आहे. सर्वोच्च न्यायालयात न जाता राज्य शासनाने आरक्षणासाठी आवश्यक त्या त्रुटींची तत्काळ पूर्तता करुन अंतरिम स्थगिती रद्द करुन घ्यावी व अध्यादेश विधानसभेत पारित करुन घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी दुष्काळाने होरपळून निघाला आहे. तो अत्यंत दयनीय हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची गरज आहे, असे मनोज आखरे यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यासाठी औद्योगिक धोरणाच्या धर्तीवर स्वतंत्र कृती धोरण तयार करावे व ते अधिवेशनात मांडावे, मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा, ओबीसी जातनिहाय जनगणना करावी आदींसह विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. या मोर्चामध्ये विभागीय कोकण संघटक प्रवीण कोलापटे, प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा संघटक सुबोध सावंत-देसाई, तालुकाध्यक्ष रोहन सुर्वे, खेड तालुकाध्यक्ष संतोष कदम, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विजय सावंत आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. राज्य विधानसभेचे अधिवेशन नागपूर येथे सुरू होत असून त्या पार्श्वभूमिवर मराठा सेवा संघाचा हा मोर्चा विराट होईल व त्याद्वारे सरकारवर दबाव आणला जाईल असे यावेळी सांगण्यात आले. मोचार्ची तयारी राज्यात सर्वत्र करण्यात आली. (वार्ताहर)