शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लांजा तालुक्यात यंदा महिनाभर आधी पाणीटंचाई

By admin | Updated: March 27, 2016 01:07 IST

पाण्यासाठी वणवण : सहा वाड्यात भीषण परिस्थिती

रत्नागिरी : लांजा तालुक्याला गतवर्षीपेक्षा यंदा महिनाभर आधी पाणीटंचाई भेडसावू लागल्याने येथे येत्या काही दिवसांत पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्यातील सहा गावांमधील सहा वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात दरवर्षी खेड तालुक्यातील खवटी येथील धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. यंदा या तालुक्यामध्ये मार्च महिन्याच्या पंधरवड्यानंतर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गतवर्षीपेक्षा आठवडाभर आधीच या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याने यंदा या तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. लांजा तालुक्यातील पालू गावातील चिंचुर्टी धावडेवाडीत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याच वाडीमध्ये यावर्षीचा जिल्ह्यातील पाणीपुरवठा करणारा पहिला टँकर मागील आठवड्यामध्ये पोहचला. आज पाणीटंचाईची स्थिती पाहता आठवडाभराच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यांत पाच गावांमधील पाच वाड्यांची संख्या वाढली असून, एकूण सहा गावांमधील सहा वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. यामध्ये दोन तालुक्यांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या सर्व टंचाईग्रस्त वाड्या उंचावर आहेत. या टंचाईग्रस्त वाड्यांना शासनाकडून केवळ दोन टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी तो अपुरा आहे. केवळ पिण्याच्या पाण्याची सोय होत आहे. त्यामुळे येथील जनावरांची पाण्यासाठी तडफड सुरू आहे. (शहर वार्ताहर) टॅँकरने पाणीपुरवठा गतवर्षीच्या पाणीटंचाईमध्ये लांजा तालुक्यामध्ये ११ एप्रिलपासून पहिल्या टँकरने पाणीपुरवठा केला होता; मात्र यंदा महिनाभर आधीच या तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने येथील जनतेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत लांजा तालुक्यातील पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टंचाईग्रस्त गावे खेड तालुका : तुळशी खुर्द कुपजई, धनगरवाडी, खवटी, वरची धनगरवाडी, चिंचवली, ढेबेवाडी, आंबवली, भिंगारा धनगरवाडी लांजा तालुका : पालू, चिंचुर्टी धावडेवाडी, कोचरी, भोजवाडी