शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्र सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

रत्नागिरी : ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी लसीकरण सुलभ व्हावे, म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि रत्नागिरीतील ...

रत्नागिरी : ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी लसीकरण सुलभ व्हावे, म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि रत्नागिरीतील उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, उद्योजक सौरभ मलुष्टे, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र गावडे उपस्थित होते. सामाजिक कार्याचा वसा घेतलेले सौरभ मलुष्टे यांनी ही संकल्पना व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली़ व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व आरोग्य सभापती उदय बने यांनी या संकल्पनेला तत्काळ मंजुरी दिली होती.

रत्नागिरी शहरातील विविध भागात जाऊन ही लसीकरण व्हॅन ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणार आहे. कोविडचा सामना खऱ्या अर्थाने करायचा असेल तर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण विनासायास पार पडावे, या तळमळीने उद्योजक सौरभ मलुष्टे मागील अनेक दिवसांपासून काम करत आहेत. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मलुष्टे यांनी मोफत रिक्षाचीही व्यवस्था केली होती. ज्येष्ठांना लसीकरण सुविधा विनासायास मिळावी, यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सौरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग ज्येष्ठांसाठी खूप अडचणीचे होते, त्यातूनही या उपक्रमामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळेच हा उपक्रम लसीकरण प्रक्रिया वाढीसाठी मदतीचा ठरणार आहे.

-----------------------

रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे लसीकरण हाेण्यासाठी जिल्हा परिषद व उद्याेजक साैरभ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लसीकरण केंद्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, साैरभ मलुष्टे, डाॅ. बबिता कमलापूरकर व अन्य उपस्थित हाेते. (छाया : तन्मय दाते)