शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माेबाइलमुळे झाली ‘मेमरी लाॅस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

रत्नागिरी : मोबाइलचा वापर सर्वच गोष्टींसाठी होत असल्याने, आता फोन करतानाही नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे न्युमरिकल ...

रत्नागिरी : मोबाइलचा वापर सर्वच गोष्टींसाठी होत असल्याने, आता फोन करतानाही नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे न्युमरिकल मेमरीचा वापर थांबला आहे. मात्र, जे अद्याप मोबाइल वापरत नाहीत, अशा ज्येष्ठ व्यक्ती किंवा मुले यांना फोन नंबर्स लक्षात ठेवणे सोपे झाले आहे. त्यामुळे मोबाइलमुळे मेमरीवर परिणाम झाला आहे, असेच म्हणायला हवे.

असे का हाेते?

मोबाइलमध्ये सगळ्याच गोष्टी एका क्लिकवर मिळतात. त्यामुळे लहानशा संख्यात्मक गोष्टींसाठी आपण मेंदूला ताण न देता, मोबाइलचा वापर करतो.

सध्या प्रत्येकाचाच संपर्क वाढल्याने फोननंबरही वाढले आहेत. कामाचा व्याप वाढल्याने नंबर लक्षात ठेवणे अशक्य झाले आहे. मोबाइल क्रमांक दहा आकडी असेल, तरी ते मोबाइलमध्ये सहजगत्या सेव्ह असल्याने आपणाला ते रेडिमेड मिळतात.

हे टाळण्यासाठी ...

n मोबाइल क्रमांक लक्षात ठेवायला हवेत, ते आठवायला हवेत, अशी इच्च्छाशक्ती असायला हवी.

n शाळेतील पाढे विसरून दोनअंकी बेरीज - वजाबाकीसाठी मोबाइलवर अवलंबून राहत आहोत.

n ही सवय जाण्यासाठी मोबाइलऐवजी स्वत:च्या मेंदूला ताण देऊन प्रक्रिया कराव्यात.

n फोननंबर लक्षात ठेवण्यासाठी ठरावीक ट्रिक वापरण्याचा प्रयत्न सातत्याने करावा.

मुलांना, आजाेबांना नंबर्स पाठ कारण...

आजोबा

जनार्दन साळवी हे आजोबा म्हणतात, त्यांच्या काळी पाठांतर असल्याने ती सवय पुढेही कायम राहिली. त्यामुळे आता मुलांचे किंवा नातेवाइकांचे फोननंबर अजूनही लक्षात आहेत. आता माझ्याकडे साधा मोबाइल आहे, परंतु तरीही सगळ्यांचे नंबर तोंडपाठ आहेत.

वडील

विद्याधर साळवी म्हणतात, कामाच्या स्वरूपामुळे हजारो लोकांचे मोबाइल नंबर सेव्ह करून ठेवावे लागतात. सध्या धकाधकीच्या काळात काय काय लक्षात ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे प्रत्येक वेळी मोबाइल मदतीला धावतो. एखादा नंबर आठवायचा म्हटलं तरी शक्य होत नाही.

मुलगी

सातवीत असलेली रुचा साळवी म्हणते, माझ्याकडे मोबाइल नसला, तरी मला माझ्या आई-बाबांचा, दादाचा मोबाइल नंबर तोंडपाठ आहे. मी हे नंबर पाठच करून ठेवले आहेत. त्यामुळे कधी कुणाला सांगायचे झाले, तर मला ते पटकन आठवतात. काही वेळा लिहून ठेवले की लक्षात राहतात.

पूर्वी शाळेत असताना पाढे संपूर्ण पाठ करावे लागायचे. त्यामुळे गणितातील चार प्रमुख क्रिया स्वत: चटकन करता येत असत. आता मोबाइलवर कॅलक्युलेटर आला. त्यामुळे त्याचा वापर वाढला. हजारो फोन नंबरही मोबाइलवर सेव्ह होत असल्याने, फोन करण्यासाठी केवळ नंबर डायल करावा लागतो. नंबर आठवण्यासाठी आपण मेंदूला ताणही देत नाही. आपण आपली मेमरी न वापरता नेहमी मोबाइलचीच वापरतो. त्यामुळे आपल्या मेमरीचा ऱ्हास होत आहे. मात्र, आपण तो लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स वापरल्या, तर हे शक्य आहे. मात्र, त्यातही सातत्य हवे.

- डाॅ.अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.