लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : काेकण किनारपट्टीवर येऊन धडकलेल्या ताैक्ते चक्रीवादळाने राजापूर तालुक्याला जाेरदार तडाखा बसला़. या वादळात तालुक्यातील कालिकावाडी येथील आई - वडिलांचे छत्र हरपलेल्या पूजा पांडुरंग साळवी हिच्या घराचे छप्पर उडून गेले. या कुटुुंबाची आमदार राजन साळवी यांनी भेट घेऊन चाेवीस तासात घरावर छप्पर टाकून दिले.
राजापूर तालुक्यातील वाडापेठ कालिकावाडी येथे पूजा पांडुरंग साळवी ही आपल्या दोन भावंडांसह परिस्थितीशी दोन हात करीत राहते. ताैक्ते वादळात तिच्या घरावरील छप्पर उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी संपू्र्ण घरात पसरले हाेते. घरावरचे छप्परच गेल्याने घरात राहायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला हाेता़.
आमदार राजन साळवी ताैक्ते वादळादरम्यान राजापूर सागरी किनारपट्टीजवळील गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेत फिरत हाेते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले यांनी आमदार राजन साळवी यांना या परिस्थितीची माहिती दिली. आमदारांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पूजा साळवी यांच्या घराला भेट दिली़. एवढ्यावरच न थांबता त्यांनी घरावर लागणारे पत्रे उपलब्ध करून दिले. चोवीस तास होण्यापूर्वीच पूजा साळवी यांच्या घरावर नवे छप्पर घालून दिले. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला़
---------------------
असेही दायित्व
नुकसान झाल्यानंतर अनेक वर्षे भरपाईची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आमदार राजन साळवी यांनी नुकसानीची पाहणी करतानाच गरज असेल तेथे तातडीने मदत केली. पूजा साळवी यांच्या घराची परिस्थिती पाहता त्यांनी राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला हाेता़. त्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार साळवी यांनी तातडीने पत्रे उपलब्ध करून दिले. नुकसानीची पाहणी करतानाच त्यांनी तत्काळ पत्रे उपलब्ध करून देत आपले दायित्व दाखवून दिले.