शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार-नगराध्यक्षांमध्ये पाणी पेटले

By admin | Updated: May 17, 2016 01:46 IST

मलुष्टेंना टोला : महेंद्र मयेकर युपीतला भय्या नव्हे-- उदय सामंत : गुरुवारी पालिकेतच पे्रझेंटेशन होणार

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेचे सभागृह हे पालिकेच्या सभांसाठी आहे. त्यात अन्य कोणाला सभा घेता येणार नाहीत. त्यामुळे १९ मे रोजी या सभागृहात सभा घेण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करणे भाग पडेल. अशा स्थितीत खासदार विनायक राऊत यांच्याकडून कोणताही गुन्हा घडू नये, अशी अपेक्षा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पत्रकारपरिषदेत केले. गेल्या आठवडाभरापासून आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्यात पाण्यावरून वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत, उपनगराध्यक्ष विनय तथा भय्या मलुष्टे, प्रमोद शेरे आणि राहुल पंडित यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारपरिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी पाणी प्रश्नावरून नगराध्यक्षांना ठणकावले होते. १९ मे रोजी पाणी योजनेबाबतचे सादरीकरण नगरपरिषदेत होणारच, असे स्पष्ट केले होते. त्याला आज नगराध्यक्ष मयेकर यांनी पत्रकारपरिषदेत उत्तर दिले. सभेसाठी आमदार सामंतांकडून आलेल्या पत्राला मुख्याधिकाऱ्यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे सभागृहात ही सभा घेता येणार नाही. शेरे, सावंत, मलुष्टे व पंडित यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला केला. शेरे यांनी मोठे डोळे करून देणगी, वर्गणीच्या रुपाने खंडणी घेणे थांबवावे व मारुतीआळी रस्त्याकरिता १० फूट जागा देऊन शहर विकासाला हातभार लावावा. शेरे यांच्या घरात फटाके फुटल्यास बाजारपेठ धोक्यात येईल. राहुल पंडित यांनी टायपिंग सेंटर तळमजल्यावर की बेसमेंटला आहे ते आधी पाहावे, मग नैतिकतेबाबत बोलावे. उपनगराध्यक्ष भय्या मलुष्टे यांनी प्रथम सकाळी ७ वाजता नगरपरिषदेत येऊन स्वच्छता कामाची माहिती घ्यावी. महेंद्र मयेकर युपीतला भय्या नव्हे, मला ठणकावून सांगू नका, असा शेराही मारला. पाणी योजनेची माहिती देऊनही स्टंट केला जात आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)रत्नागिरी : वाढीव पाणी योजनेचा ६८ कोटींचा प्रस्ताव हा रत्नागिरी पालिकेशी संबंधित आहे आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा आहे. त्यामुळे या प्रलंबित प्रश्नाची तड लावण्यासाठी प्रकल्पाचे प्रेझेंटेशन १९ मे रोजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत होणार आहे. ते पालिकेच्या सभागृहात होऊ न दिल्यास पालिकेच्या कॅम्पसमध्ये अगदी गॅरेजमध्येही घेण्याची आमची तयारी आहे. जनतेचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी शंभर पावले मागे येण्यास आम्ही तयार आहोत. त्याचे ज्यांना राजकारण करायचे त्यांनी जरूर करावे, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत केले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी शहर येते. या शहराला शासनाकडून आलेला निधी व जिल्हा नियोजनमधून दिलेला निधी याचा कसा वापर झाला, याचा आढावा घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. तशी आढावा बैठक गेल्या चार दिवसांपूर्वी आपण पालिकेत घेतली आणि पाणी अचानक पेटले. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याचा आमचा उद्देश नाही. वाढीव पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाला दिला, ही चागंली गोष्ट आहे. परंतु तो प्रस्ताव ज्या प्रकारे जाणे आवश्यक होते तसा गेलेला नाही. सुकाणू समितीसमोर प्रस्ताव पोहोचला नाही. म्हणून प्रलंबित योजनेचे काम तातडीने व्हावे, यासाठीच आपण सांघिक प्रयत्नासाठी यात पुढाकार घेतला. या प्रकल्पात नेमके काय होणार आहे हे लोकप्रतिनीधी व नगरसेवकांना जाणून घेण्याचा हक्क आहे. आपल्याला कोणतेही श्रेय नको, जनतेला लवकरात लवकर पाणी मिळणे महत्वाचे आहे. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पत्रकारपरिषदेत व्यक्तीगत पातळीवर आरोप करणे शोभणारे नाही. तिवंडेवाडीतील ४०० सदनिकांच्या संकुलास पाणी देण्यास माझा व खासदार राऊत यांचा विरोधच आहे. पालिकेकडून पारदर्शक कारभाराची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)