शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भंगार व्यवसायातून लाखोंची उलाढाल

By admin | Updated: November 19, 2014 23:17 IST

लांजा तालुका : दिवसाकाठी ५० ते १०० किलोचे भंगार होते गोळा

कुवे : लांजा शहरात सध्या भंगार व्यवसाय तेजीत असून, या भंगारामधून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत असल्याचे दिसत आहे.भंगार म्हटलं की, अनेकजण नाकं मुरडतात. मात्र, या भंगार गोळा करण्याच्या व्यवसायावर तालुक्यातील अनेक परप्रांतीयांचा उदरनिर्वाह चालतो. दर दिवशी हे परप्रांतीय कामगार परिसरातून भंगार गोळा करून त्यावर लाखो रूपये कमावत आहेत.या भंगार व्यवसायामध्ये परप्रांतीय मंडळी मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहेत. दिवसाकाठी कित्येक ट्रक भंगार गोळा केले जात असून, या भंगारामधून लाखोंची उलाढाल होताना दिसत आहे. मिळेल त्या ठिकाणी हे व्यावसायिक आपला भंगार व्यवसाय सुरु करतात. भंगारात विविध वस्तू कवडीमोलाच्या रुपाने हे परप्रांतीय खरेदी करतात. मात्र, मोठ्या बाजारपेठांमध्ये ते वाढत्या बाजारभावानुसार विकतात. प्लास्टिक, लोखंड, पत्रा, रद्दी, पुठ्ठे आदी वस्तू ते भंगारामध्ये विकत घेतात.कोकणात भंगाराचा व्यवसाय म्हटल्यावर तो कमी दर्जाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भंगाराच्या व्यवसायावर परप्रांतीयांनी आपला कब्जा केला आहे. हे परप्रांतीय बाहेरुन येऊन घरोघरी हातगाड्या फिरवत भंगार गोळा करण्याचा धंदा करतात. या भंगारासाठी कांदा, बटाटा तर कोणी भांडीदेखील भंगाराच्या बदल्यात देऊन हा व्यवसाय करतात. यामध्ये दिवसाकाठी ५० ते १०० किलो भंगार हे परप्रांतीय गोळा करतात. हे भंगार एकत्र करुन मग ती टनामध्ये भरुन वाढत्या बाजारभावावेळी बाहेर पाठवले जाते. यामधून लाखोंची उलाढाल होते. (वार्ताहर)लांजात भंगार व्यवसाय तेजीत.भंगारमधून दिवसाकाठी लाखोची उलाढाल.या व्यवसायात परप्रांतीयांचा अधिक भर.भंगारातून मिळणाऱ्या लाखोच्या उलाढालीची शासन दरबारी कोणतीही नोंद नाही.