शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

दुधही महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : कोरोना संकट काळात महागाईचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. अन्नधान्य, भाजीपाला याबरोबरच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही ...

रत्नागिरी : कोरोना संकट काळात महागाईचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. अन्नधान्य, भाजीपाला याबरोबरच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. त्यात आता दूध दरवाढीची भर पडली आहे. दूध दोन रुपयांनी महागल्याने आता सामान्य जनता अधिकच मेटाकुटीस येणार आहे.

कोकणासाठी निधी

रत्नागिरी : कोकणात मे महिन्यात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने असंख्य नुकसान केले. या चक्रीवादळात नुकसान झालेल्या बाधितांसाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी कोकणासाठी १५२ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

पावसाची प्रतीक्षा

मंडणगड : गेल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीअंशी पेरणीची कामे करुन घेतली होती. काही शेतकऱ्यांची शिल्लक होती. त्यातच लावणीला सुरुवात झाली होती. परंतु, ऐनवेळी पावसाने पाठ फिरवल्याने काही शेतकऱ्यांच्या लावणीत अडथळा आला आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करण्यावाचून गत्यंतर नाही.

शासकीय दूध योजना मोडीत

रत्नागिरी : शासकीय दूध योजना मोडीत निघण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात दिवसाला सुमारे दीड ते दोन लाख लीटर दूध लागते. मात्र, शासकीय दूध योजनेत केवळ ७ हजार लीटरच दूध उपलब्ध होत आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या असल्या तरी या योजनांच्या अमलबजावणीसाठी पुरेशी पदे नसल्याने ही योजना मोडीत निघणार आहे.

नादुरुस्त रुग्णवाहिका

राजापूर : तालुक्यात रुग्णवाहिकांची कमतरता आहे. अशातच बंद पडलेल्या रुग्णवाहिका दुरुस्त न झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. राजापूर तालुका आरोग्य विभागाची रुग्णवाहिका अनेक वर्षांपासून नादुरुस्त असून, पांगरे येथील श्री निनाई देवी मंदिराजवळ अनेक दिवस उभी आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मत्स्य कार्यालयाची दुरवस्था

रत्नागिरी : शहरातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांचे मिरकरवाडा येथील कार्यालय पूर्णपणे जीर्ण झाले असून, कधीही कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे एक मजली कार्यालय पूर्णपणे गळत असून, लोखंडी स्ट्रक्चरही गंजले आहे. या इमारतीला कधीही धोका होऊ शकतो, त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत धरुन कामकाज करत आहेत.

लॉकडाऊन अफेवेने संभ्रम

दापोली : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पुन्हा कडक लॉकडाऊन होणार, अशी अफवा पसरल्याने ग्रामीण भागात संभ्रमावस्था वाढली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून लॉकडाऊनबाबत कोणतीही नवीन सूचना आलेली नाही. तरीही समाजमाध्यमांवर असे संदेश फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जीवनावश्यक साहित्य

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील ओवळी कातकरीवाडीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने आदिवासी वस्तीतील अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते. यानंतर आमदार शेखर निकम यांच्यासह काही संस्थांनी मदतीचा हात पुढे केला होता. ओवळी ग्रामपंचायत सदस्य दीपिका शिंदे यांनीही कातकरीवाडीला जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.

शिक्षण शुल्क कपात

दापोली : कोरोना काळातील मंदीचा विचार करुन इतर विद्यापीठांप्रमाणेच कृषी विद्यापीठानेही शिक्षण शुल्कात कपात करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन विद्यापीठाला देण्यात आले असून, कठीण काळात विद्यार्थी हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

शैक्षणिक साहित्य वाटप

खेड : तालुक्यातील खोपी गावातील काडसिद्धेश्वर आनंदाश्रमातील मुलांना हेड ऑफ अ‍ॅक्शन, बांद्रा संस्थेचे अध्यक्ष निकेश भोसले यांच्याकडून धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आनंदाश्रमाच्यावतीने डॉ. विवेक मोरे यांनी या वस्तूंचा स्वीकार करुन या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

योजनेची पाईपलाईन जोडली

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने तोडली होती. आंजर्लेला खुटीचे पाणी या ठिकाणावरुन पाणी पुरवठा केला जातो. ग्रामपंचायतीकडून जाॅईंटने हा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु, ही पाईपलाईन तोडल्याने गैरसोय होत होती. पंचनाम्यानंतर पाईपलाईन जोडण्यात आली आहे.

अनुदानापासून वंचित

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील सुमारे ७ हजार लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेतून मिळणाऱ्या हक्काच्या अनुदानापासून गेल्या दोन महिन्यांपासून वंचित राहावे लागले आहे. या योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये, ९०० रुपये आणि ६०० रुपये अशी पेन्शन लाभार्थ्यांना दिली जाते. परंतु, राज्य शासनाकडून आवश्यक असलेले अनुदानच अद्याप न आल्याने पेन्शन रखडली आहे.

अनधिकृत वाळू उत्खनन

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे गावात सक्शन पंपाद्वारे गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन सुरु आहे. आंगवली पंचक्रोशीतही अशाचप्रकारे अवैध उत्खनन सुरु असून, महसूल अधिकाऱ्यांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. या अवैध वाळू उत्खननामुळे प्रशासनाचे करोडोंचे नुकसान होत आहे.

कापडी पिशव्यांचे वाटप

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील रामपूर जिल्हा परिषद गटात कात्रोळी येथे राष्ट्रवादीतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, माजी सरपंच जगदीश पवार, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष मनोहर जाधव तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

चित्रशाळांमध्ये लगबग

लांजा : गेल्यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. यावर्षी विघ्नहर्त्याने जगावरील हे सावट दूर करावे, यासाठी आता जनता गणेशोत्सवाची तयारी करु लागली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने छोट्या मूर्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने आता चित्रशाळांमध्ये लगबग सुरु झाली आहे.