शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

स्थलांतरणाची नोटीस जारी

By admin | Updated: August 27, 2014 23:26 IST

वडदहसोळमध्ये भीती : ५१ कुटुंबांना दक्षतेचा आदेश

राजापूर : पुण्यातील माळीण दुर्घटनेनंतर सावध झालेल्या महसूल प्रशासनाने वडदहसोळ गावातील ५१ कुटुंबीयांना तातडीने स्थलांतराची नोटीस बजावली आहे.यापूर्वी २००९ साली झालेल्या लगतच्या डोंगराचा मोठा भाग तुटून खाली असलेल्या घरावर कोसळून म्हादये कुटुंबातील आठजण जागीच गाडले गेले होते, तर शिवणे बुद्रुक गावाकडे जाणारा रस्ता पूर्ण खचल्याने गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. मागील सहा-सात वर्षांत अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाबाबत शासनाने कोणतेच धोरण राबवलेले नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊनच राहावे लागत आहे.दरम्यान, पुण्यातील माळीण येथील जीवघेण्या घटनेनंतर हादरलेल्या प्रशासनाने तालुक्यातील धोकादायक परिसराची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी केली. त्याचा अहवाल १ आॅगस्ट २०१४ला राजापूर तहसीलदारांना सादर करण्यात आला. त्यानुसार तहसीलदारांनी वडदहसोळ गावातील म्हादयेवाडीतील १२, हळदीची खादवाडीतील ३५ आणि हसोळ गोपाळवाडीतील ४ अशा ५१ कुटुंबीयांना तत्काळ स्थलांतराची नोटीस बजावण्यात आली. मात्र, या कुटुंबीयांनी नक्की कुठे जायचे. याबाबत त्या नोटीसमध्ये काहीच नमूद नाही. पर्यायी व्यवस्थादेखील केलेली नाही. त्यामुळे धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांपुढे अडचणी वाढल्या आहेत. शासनाच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. केवळ नोटीस बजावून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. पर्यायी जागा वेळेवर उपलब्ध करुन देण्याकामी शासन आपले कर्तव्य पार पाडणार नसेल तर त्या केवळ नोटिसीला अर्थ काय, सवाल ग्रामस्थांतून उपस्थित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)