शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री हाहा:कार

By admin | Updated: March 12, 2015 00:05 IST

फुणगूस परिसर : वादळी वाऱ्यांमुळे ग्रामस्थांनी रात्र काढली जागून

फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री भयंकर अशा वादळासह अवकाळी पावसाने अक्षरश: हैदोस घातला. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की मोठमोठी झाडे अक्षरश: उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले, तारा तुटल्या, तसेच अनेक घरांना वादळाचा तडाखा बसला. घराचे छप्पर उडाले, भिंती पडल्या, कौले उडाली. त्यामुळे मध्यरात्री एकच हाहाकार उडाला. वादळाच्या तडाख्यामुळे फुणगूस-डिंगणी खाडी भाग गेले अठरा तास अंधारात पडला आहे.मंगळवारी सायंकाळी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरुवात झाली. परंतु, खऱ्या अर्थाने अवकाळीची वक्रदृष्टी संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीभागावर पडली आणि पावसासह वाऱ्याने देखील येथे नुकसानीला सुरूवात केली. हळुहळू पावसाचा आणि वाऱ्याचा जोर वाढत गेला. जोडीलाच विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरु झाला. तेव्हा वादळाचे स्पष्ट संकेत दिसू लागले.रात्री १० च्या सुमारास वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. दुसऱ्या बाजूला पावसाचा जोरही वाढला आणि भयंकर असे वादळ परिसरात घोंघावू लागले. वादळाचा वेग क्षणाक्षणाला वाढू लागला आणि लोकांची भीतीने गाळण उडाली. तोपर्यंत वीजपुरवठा खंडित झालेला होता. वादळी वाऱ्याची तीव्रता इतकी भयंकर होती की विजेचे खांब जमिनीतून उन्मळून पडले. अनेक ठिकाणी लहान मोठी झाडे तुटून पडली. वादळाने जणू थैमान मांडले होते. निसर्गाच्या या रौद्ररुपाने ग्रामस्थ भयग्रस्त झाले होते.वीजेचे खांब, तारा, झाडे यांना दणका दिल्यानंतर वादळाने थेट घरांना लक्ष केले. अनेक घरांची कौले उडून गेली, पत्रे वाऱ्याच्या झोताबरोबर उखडून गेले. पुढे वादळाने अधिकच उग्ररूप धारण केले. अनेक घरांच्या पडव्या पडल्या, भिंती जमीनदोस्त झाल्या. डोळ्यांदेखत राहती घरे कोसळत असताना कोणीच काही करु शकत नव्हते. अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. वादळाच्या दणक्याने फुणगूस मोहल्ला येथील कादर हसन खान यांच्या पिठाच्या गिरणीचे छप्पर पूर्णपणे उडून गेले. चिऱ्याच्या भिंती कोसळल्या. त्यांच्याच घराच्या पडवीचेही छप्पर उडून गेले. हनिफ बोदले यांच्या घराची पडवी वादळाने जमीनदोस्त केली. अनेकांच्या घरावर झाडांच्या फांद्या पडून मोठे नुकसान झाले. नुकसानीचा निश्चित आकडा अद्याप उपलब्ध झालेला नाही. वादळाने संपूर्ण खाडीपट्ट्यात थैमान घातले होते. डिंगणी, कुरधुंडा, कोंड्ये, मेढे, मांजरे अशा अनेक गावांना वादळाचा प्रचंड मोठा तडाखा बसला आहे. आंबा तसेच काजू बागांची दाणादाण उडाली. आंबाफळे गळून पडल्याने बागायतदारांचे नुकसान झाले आहे. या वादळाने गतकाळातील फयान वादळाच्या स्मृती जाग्या केल्या. (वार्ताहर)