शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सदस्यत्वच धोक्यात

By admin | Updated: November 29, 2015 01:03 IST

ग्रामपंचायत निवडणुका : ४१४ सदस्यांनी खर्चच जमा केला नाही

राजापूर : राजापूर तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील ४१४ ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याने त्यांचे सभासदत्व धोक्यात आले आहे. ३० दिवसांच्या आत हे खर्चाचे विवरण पत्र न दिल्याने त्यांच्यावरील कारवाई अटळ बनली आहे.एप्रिल महिन्यात राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये बिनविरोध निवडणुका वगळता उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये ८१५ उमेदवार रिंगणात होते. निकाल लागल्यानंतर पुढील ३० दिवसांत उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाचे विवरणपत्र निवडणूक कार्यालयाकडे सादर करावयाचे होते. मात्र, ४१४ ग्रामपंचायत सदस्यांनी ते अद्याप सादर केले नसल्याचे आढळून आले आहे.अणसुरे १२, मंदरुळ १७, शीळ ४, गोठणे दोनिवडे ९, दोनिवडे १०, कोंंडीवळे ११, आंबोळगड १९, सौंदळ १६, कुवेशी १८, शिवणेखुर्द ३, धोपेश्वर ६, महाळुंगे ४, कारवली १, सावडाव ४, ओशिवळे १०, पन्हळेतर्फे सौंदळ ५, कोळंब १७, काजिर्डा ९, मिळंद - सावडाव ९, हातदे ८, कुंभवडे ३, दळे ४, ओणी १०, चुनाकोळवण ७, कोदवली ८, पांगरे बु. ७, तळगाव ५, तारळ ९, वाडापेठ ८, कशेळी ११, कोंडसर १२, तुळसवडे ८, रायपाटण १५, ताम्हाणे १५, मोरोशी ५, चिखलगाव ४, आडवली १३, गोवळ ५, उन्हाळे ७, ससाळे २, पडवे ३, फुफेरे ३, आंबोळगड ११, पांगरेखुर्द ९, कोतापूर १, करक ६, हरळ ७, परटवली ७, वाल्ये ६ असा समावेश आहे.जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, त्यावर या सर्व उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)कारवाई होणार? : बहुतांशी विजयी उमेदवारराजापूर तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत सदस्य हे विजयी उमेदवार असून, त्यांच्यावर अपात्रतेची तर पराभूत उमेदवारांवर ५ वर्षे निवडणूक न लढवण्याची कारवाई होऊ शकते. या उमेदवारांनी आपल्या खर्चाचे तपशीलवार विवरण सादर न केल्याने ही कारवाई निश्चित मानली जात आहे.