गुहागर : तालुक्यातील तवसाळ पडवे परिसरात तत्त्वतः मान्यता मिळालेल्या मेगा लेदर आणि फुटवेअर प्लास्टर उद्योगाला चालना मिळावी, याबाबत तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवेदन दिले आहे. याबाबत सविस्तर चर्चेसाठी दिल्लीत येण्याचे निमंत्रण मंत्री राणे यांनी त्यांना दिले आहे.
तालुक्यातील तवसाळ पडवे परिसरात मेगा लेदर आणि फुटवेअर उद्योग उभारणीसाठी २०१९ आली केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने तत्त्वतः मान्यता मिळाली होती. यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे या प्रकल्पाला गती मिळू शकली नाही. हा विषय ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा असल्याने जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे दौऱ्यावर आले असताना भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यावेळी उपस्थित होते. हा विषय वाणिज्य मंत्रालयातून तत्त्वतः मान्यता झालेला असला तरी रोजगार निर्मितीच्या या मेघा लेटर आणि फुटवेअर कलेक्टरला गती मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. याबाबत सविस्तर चर्चा करण्याकरिता व या उद्योग निर्मितीला गती देण्याकरता डॉ. नातू यांच्यासह दिल्लीत येण्याचे निमंत्रणही दिले आहे.
जगात लेदर आणि फुटवेअर उत्पादन क्षेत्रात चीन हा देश पुढे आहे. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. हा प्रकल्प तालुक्यामध्ये उभा राहिल्यास यासंबंधित पूरक छोटे मोठे उद्योग उभे राहतील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होईल. अनेक रिकाम्या हातांना काम मिळून एक मोठी बाजारपेठ तयार होईल या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नीलेश सुर्वे यांनी डॉ. नातू यांच्या मार्गदर्शनाने हा उद्योग तवसाळ पडवे परिसरात परिसरात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, संतोष जैतापकर, मंगेश जोशी, सचिन ओक, दिनेश बागकर, विजय भुवड, संदीप साळवी, विनायक सुर्वे, रवींद्र अवेरे, शार्दुल भावे, दीपक मोरे, विजय मसुरकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.