शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजप चिंतन बैठकीतून कार्यकर्त्यांचा सभात्याग

By admin | Updated: March 8, 2017 23:21 IST

गुहागरमध्ये बैठक; जिल्ह्याध्यक्षांशी वादावादीनंतर कृती

गुहागर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात चिंतन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत गुहागरमध्येही बुधवारी ‘भाजप’ची बैठक घेण्यात आली; परंतु जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांशी सुरू केलेल्या वादावादीमुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सभात्याग केल्याची घटना या बैठकीत घडली. जिल्हाध्यक्ष उपस्थित असतील, तर आम्ही सभेला बसणार नाही, असे ठणकावत सांगत उपस्थित कार्यकर्त्यांनी सभात्याग केल्याने सभाच निष्फळ ठरली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री दुर्गादेवी मंदिराशेजारील सभागृहात गुहागर तालुक्याचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्त्यांची दुपारी ३.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष बाळ माने उशिरा आल्याने ही सभा सायंकाळी ५.१५ वाजता सुरू झाली. सभेला जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासह शशिकांत चव्हाण, स्मिता जावकर, जिल्हा परिषद सदस्य स्मिता धामणसकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत बाईत, तालुकाध्यक्ष बावा भालेकर हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी बहुतांश उमेदवार व कार्यकर्ते असे ५० ते ६० जण यावेळी उपस्थित होते. ‘निवडणुकीत याने काम केले नाही, त्याने काम केले नाही’, अशी नेहमीच्या पठडीतील कारणमीमांसा न सांगता प्रत्येक उमेदवाराने पराभवाची कारणे सांगावीत,’ असे बाळ माने यांनी सुरुवातीलाच सांगितले. आपल्याच कार्यकर्त्याने विरोधात केलेले काम, उमेदवाराचे शिक्षण, उमेदवारी निश्चिती याबाबत उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी सांगावयास सुरुवात केली; परंतु या सर्वांवर समाधानकार उत्तरे देण्यात आली नाहीत. पहिल्यांदा उमेदवार कोण होत? हे आपल्याला माहीत नाही, असेच सांगितले. पडवे गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला कसा? त्याठिकाणी दुसरा उमेदवार का दिला नाही, अशी चर्चा सुरू केली. या चर्चेदरम्यान तालुका खजिनदार रवींद्र कानिटकर यांना ‘तू कोण?’ अशी विचारणा जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केल्याने सारेच अवाक् झाले. कानिटकर यांनी ओळख करून देताना गुहागर शहरात आपल्याच उपस्थितीत झालेल्या मागील बैठकीचा दाखला दिला; परंतु माने त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी आमचे म्हणणे ऐकून न घेता उमेदवारांसह सर्वांना खाली बसावयास सांगत असाल तर मी निघतो, असे तालुका खजिनदाराने म्हटल्यावर त्यांना जाण्यास सांगितले. त्यामुळे उपस्थित सर्वच कार्यकर्ते संतप्त झाले. (प्रतिनिधी)