शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन विकासासाठी वित्तमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: July 29, 2016 23:18 IST

मुंबईत बैठक : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व आमदारांचा निर्णय

रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाने अद्याप निधी दिला नसल्याने आता या निधीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार पुढच्या आठवड्यात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, विधान परिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तसेच विविध खात्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासासाठी ६७० कोटींचा पर्यटन विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. या आराखड्यातील प्राधान्यक्रमाने करावयाच्या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८० कोटींच्या आराखड्याची यादीही शासनाला देण्यात आली आहे. मात्र, या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे ही कामे कागदावरच आहेत. या निधीसाठी पुढच्या आठवड्यात रवींद्र वायकर यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी घेतला आहे.जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमाच्या ८० कोटींच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील पर्यटकांच्या वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोणत्या उपाययोजना केल्या, याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश वायकर यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन विकासाबाबत मुंबई येथे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण, संजय कदम, हुस्नबानू खलिफे, तसेच जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आदी उपस्थित होते.