शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘मत्स्यगंधा’त प्रवाशाला लुबाडले

By admin | Updated: January 10, 2017 22:31 IST

पाच महिन्यांनी गुन्हा दाखल : संगमेश्वर पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग

रत्नागिरी : ‘मत्स्यगंधा एक्सप्रेस’मधून पनवेल ते मेंगलोर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बिस्किट व जिरा सोड्यात गुंगीचे औषध घालून पाजले. त्यानंतर त्याला १ लाख ६९ हजार ८०० रुपयाला गंडा घातल्याची घटना आॅगस्ट २०१६ मध्ये घडली होती. याप्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लिपर्ड जेरोम वैगास (३८, कर्नाटक) असे या फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.क्लिपर्ड वैगास हा तरुण मत्स्यगंधा एक्सप्रेसने २८ आॅगस्ट २०१६ रोजी पनवेल येथून मेंगलोर येथे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याच्यासमोरील सीटवर एक ४० वर्षीय इसम बसला होता. त्याने आपण कपड्याचे व्यापारी आहोत, असे सांगून क्लिपर्ड याच्याशी मैत्री केली व गप्पागोष्टी मारण्यास सुरुवात केली. रात्री ९.३० वाजण्याचा सुमारास ही मस्त्यगंधा एक्सप्रेस ही संगमेश्वर स्थानकावर आली होती.त्यावेळी त्या अज्ञाताने क्लिपर्ड याला गुंगीचे औषध टाकलेला जिरासोडा व बिस्किटे खाण्यासाठी दिली. त्यामुळे क्लिपर्ड याला गुंगी येऊ लागली. तो तेथेच झोपी गेला. हीच वेळ साधत या अज्ञाताने त्याच्याजवळ असलेल्या सोन्यांच्या दागिन्यांसहित लॅपटॉप, मोबाईल असा १ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.दरम्यान दुसऱ्या दिवशी रेल्वे मेंगलोर टर्मिनसला पोहचली तेव्हा क्लिपर्ड याला जाग आली. त्यावेळी आपले सामान चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे क्लिपर्ड यांनी तत्काळ मेंगलोर येथील रेल्वे पोलीसांना यांची माहिती दिली. त्याठिकाणी शून्य नंबरने गुन्हा दाखल करून तो संगमेश्वर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)‘मांडवी’, ‘जनशताब्दी’मध्येही चोरीचा प्रकारमांडवी एक्स्प्रेस व जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना चिपळूण येथे रेल्वे स्टेशनमध्ये चढताना कल्याण येथील एका महिलेचे दागिने व रोख रक्कम मिळून ८२ हजार ६४१ रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. तसेच जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना एका महिलेचे १८ हजार ६८० रुपयाचे दागिने व रोख रक्कम मिळून १ लाख १ हजार ३२१ रुपयांची चोरी झाली. हे दोन्ही गुन्हे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये घडले असून ते शून्य नंबरने चिपळूण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.