शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तर जालियनवालासारखे हत्याकांड बारसूत घडवतील; खासदार विनायक राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

By मनोज मुळ्ये | Updated: April 23, 2023 16:57 IST

रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : पोलिसी बळाचा वापर करुन राज्य सरकार रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीचे सर्वेक्षण केले जात आहे. याला विरोध करण्यासाठी जर लोक रस्त्यावर उतरले तर तेथे जालियनवाला बागेसारखेषहत्याकांड घडवले जाईल, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. काही पोलिस तेथे रिफायनरीचे दलाल म्हणूनच काम करत असल्याचा आरोप करतानाच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यावरही कडाडून टीका केली.

रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिफायनरीला सनदशीर मार्गाने विरोध करणाऱ्या लोकांना जबरदस्तीने तुरुंगात डांबले जात आहे. बैठकीला बोलावून तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. ही सगळी दडपशाही रिफायनरी प्रकल्पासाठी केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. शनिवारी एकाच दिवशी बारसू परिसरातील प्रत्येक गावातील तीन चार लोकांना तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या, असेही ते म्हणाले.

यावेळी खासदार राऊत यांनी पोलिस खात्यावर सडकून टीका केली. पोलिसांची सध्याची भूमिका पाहता रिफायनरीला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले तर जालियनवाला बागेसारखे हत्याकांड येथे घडवले जाईल की काय अशी मानसिकता पोलिसांची आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. शिंदे सरकार पोलिसी कारवाईचा अतिरेक करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कधीही लागेल. त्याने सरकारचे भवितव्य गुंडाळले जाईल, अशी भीती या सरकारला असल्याने ते आपले काही प्रकल्प दंडुकेशाहीचा वापर करुन पुढे रेटू पाहत आहेत. त्याची सुरुवात रिफायनरीपासून झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

रिफायनरी कधी होणार, कशी होणार, जमिनीचा दर यापैकी काहीही सरकारने जाहीर केलेले नाही. मात्र भूसंपादन करुन भूमाफियांच्या माध्यमातून लाटल्या गेलेल्या जमिनींचा मोबदला उकळायचा असा डाव आहे. यातून साडेतीन हजार कोटी रुपये उकळले जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.रिफायनरी प्रकल्प राबवण्याचे कंत्राट रत्नागिरीच्या पोलिस यंत्रणेलाच दिले आहे, अशा पद्धतीने पोलिस कार्यरत झाले आहेत. एखाद्या अतिरेक्याला पकडायला जावे त्या पद्धतीने पोलिस रिफायनरी विरोधकांची बाजू घेणाऱ्या चाकरमान्यांशी वागत आहेत. पोलिस यंत्रणा त्यांचा छळ करण्यासाठीच वापरली जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत