शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरातील बाजारपेठ आठ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:33 IST

राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केवळ मेडिकल व दूध वगळून सर्व दुकाने ...

राजापूर : राजापूर शहर आणि तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, केवळ मेडिकल व दूध वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राजापूर व्यापारी संघाने घेतला आहे. इतर सर्व दुकाने १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, मुख्याधिकारी देवानंद यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रारंभी व्यापारी संघाने गुरूवारपासून संपूर्ण बाजारपेठ मेडिकल व दूध वगळून बंद ठेवण्याचा पर्याय प्रशासनासमोर ठेवला होता. मात्र, हा पर्याय प्रशासनाने अमान्य करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे बाजारपेठेतील किराणा दुकानेही बंद राहतील. केवळ घरपाेच सेवाच सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे.

जर कोणी व्यापारी दुकानातून ग्राहकाला माल देताना आढळला किंवा ग्राहकाच्या पिशवीत माल आढळला तर त्याने दुकानदाराचे नाव सांगितल्यावर त्या दुकानदारावर दहा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात येईल. तसेच त्या ग्राहकावरही कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने ही दिनांक १५ मेपर्यंत बंदच राहतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे व दूध विक्री ही सकाळी ७ ते ११ यावेळेतच सुरु राहील, त्यानंतर ती दुकानेही बंद करायची आहेत, असे मालपेकर यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. व्यापाऱ्यांनी आपली स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.