शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सागरी मासेमारी ठप्प; पर्ससीनला उद्याचा मुहूर्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:26 IST

रत्नागिरी : पारंपरिक सागरी मासेमारीला १ आॅगस्टपासून कायदेशीररीत्या सुरुवात झाली असली तरी पावसाळी वातावरणामुळे गेल्या महिनाभरात जेमतेम १५ दिवसच मासेमारी झाली आहे.

ठळक मुद्दे ३ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरूअशी माहिती कर्ला मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नदीम सोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.चार दिवसांपूर्वी समुद्रात वादळ आल्याने अद्यापही पारंपरिक मासेमारी ठप्प आहे

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : पारंपरिक सागरी मासेमारीला १ आॅगस्टपासून कायदेशीररीत्या सुरुवात झाली असली तरी पावसाळी वातावरणामुळे गेल्या महिनाभरात जेमतेम १५ दिवसच मासेमारी झाली आहे. चार दिवसांपूर्वी समुद्रात वादळ आल्याने अद्यापही पारंपरिक मासेमारी ठप्प आहे. आता पर्ससीन मासेमारीची मुदतही सुरू झाली आहे, पण आता पारंपरिक व पर्ससीन मासेमारी ईदनंतर ३ सप्टेंबरपासूनच सुरू होणार असल्याची माहिती मच्छिमारांकडून देण्यात आली.

२०१६ फेब्रुवारीपासून सागरी पर्ससीन मासेमारीला बंधने घालण्यात आली. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांतच साडेबारा वाव सागरी क्षेत्राबाहेर पर्ससीन मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी मासेमारीचे व्यवहार ठप्प असतात. सध्या सागरी हवामानही खराब असल्याने पारंपरिक मासेमारांनी समुद्रात न जाता नौका बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. २ सप्टेंबरला ईद असल्याने १ सप्टेंबरपासून नियमानुसार सुरू होणारी पर्ससीन मासेमारीही सुरू झालेली नाही. आता हवामान चांगले राहिल्यास येत्या ३ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती कर्ला मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नदीम सोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.२१० नौकांना व्ही. टी. एस. परवानेरत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन मासेमारी करणाºया २१० नौकांना व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम अर्थात व्ही.टी.एस. यंत्रणा वापरण्याचे परवाने मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आले आहेत. पर्ससीन नौकांनी कोणत्याही स्थितीत साडेबारा वाव सागरी क्षेत्राबाहेरच मासेमारी करावी, त्यांच्या नौका नेमक्या या क्षेत्राबाहेरच आहेत की नाहीत, याची माहितीही मत्स्य विभागाला मिळणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.पारंपरिक-पर्ससीन संघर्षाची धार१ आॅगस्टपासून पर्ससीन वगळता सर्व पारंपरिक प्रकारातील सागरी मासेमारी सुरू झाली. खराब हवामान आणि ईद यामुळे १ सप्टेंबरऐवजी ३ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू होणार आहे. या दोन्ही मच्छिमारांमध्ये सागरी हद्दीवरून गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. ३ सप्टेंबरपासून सुरू होणाºया पर्ससीन मासेमारीवर पारंपरिक मासेमारांचीही नजर राहणार आहे. व्ही. टी. एस. यंत्रणेचा योग्य वापर होईल व या दोन्ही मच्छिमारांमध्ये संघर्ष होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.