शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
3
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
4
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
5
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
6
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
7
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
8
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
9
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
10
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
11
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
12
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
13
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
14
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
15
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
16
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
17
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
18
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
19
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
20
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन

चिपळुणात पारावर मराठी रंगभूमी दिवस

By admin | Updated: November 4, 2015 00:08 IST

स्थानिकांचा सहभाग : आम्ही चिपळूणकर लोकचळवळीचा पुढाकार

चिपळूण : आम्ही चिपळूणकर या लोकचळवळीतर्फे गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील प्रसिद्ध पारावर मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी सायंकाळी वैशिष्ट्यपूर्ण कलाविष्कार सादर होईल. चिपळुणातील काही तरुण आणि होतकरू कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत.सुमारे तीस वर्षांपूर्वी कोकणातील पहिले वाहिले आणि अद्ययावत ठरलेले चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र गेली दहा वर्षे बंद असल्याने चिपळुणातील कलावंत आणि रसिकांची गैरसोय झाली आहे. ज्या चिपळूणने मराठी रंगभूमीला कै. डॉ. काशिनाथ घाणेकर, कै. शंकर घाणेकर यांच्यासारखे महान कलावंत दिले. त्या चिपळुणात आज नाट्यगृह नाही, ही बाब चिपळूणकरांना सलत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या मालकीचे हे सांस्कृतिक केंद्र रसिकांच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावे, यासाठी आम्ही चिपळूणकर चळवळीने पुढाकार घेतला. या लोकचळवळीच्या रेट्यामुळे सांस्कृतिक केंद्राचे रखडलेले काम चार महिन्यांपूर्वी सुरु झाले. हा प्रश्न लोकांसमोर मांडावा, या हेतूने आम्ही चिपळूणकरतर्फे केंद्रासमोरील पारावर सातत्याने विविध कार्यक्रम सादर केले जातात. पारावरचा लोकोत्सव, काव्य संध्या, कोकणरत्नांवरील चित्रफीत अशा कार्यक्रमांचा त्यात समावेश झाला. त्यामुळे एक प्रकारे हा पार सर्वसामान्य लोकांच्या अभिव्यक्तिचा मंच ठरत आहे. विशेष म्हणजे या चळवळीत चिपळूणमधील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. मराठी रंगभूमी दिनानिमित्त गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी या पारावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी चिपळूणमधील कलावंतांनी पुढाकार घेतला आहे. चिपळूणचा सुपुत्र, कलावंत ओंकार भोजने याचा त्यात समावेश आहे. याखेरीज आम्ही चिपळूणकरच्या सांस्कृतिक विभागातील ऋजुता खरे, शिवाजी शिंंदे, उमेश कुचेकर, निशिकांत पोतदार यांचा या आयोजनात पुढाकार आहे. यावेळी हे कलावंत आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मिळून एक अनोखा कलाविष्कार सादर करणार आहेत. दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पारावर साजरा होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला चिपळुणातील कलावंत आणि रसिक जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन आम्ही चिपळूणकरतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)एकशे बहात्तर वर्षांपूर्वी ५ नोव्हेंबर रोजी सांगली येथे विष्णूदास भावे लिखित सीता स्वयंवर हे संगीत नाटक सादर झाले. गायन समाज देवल क्लबतर्फे सादर करण्यात आलेले हे नाटक मराठी रंगभूमीवरील पहिले-वहिले नाटक ठरले. त्यानंतर मराठी रंगभूमीची दिमाखदार परंपरा रसिकांच्या सेवेत रुजू झाली. या दिवसाचे औचित्य साधून आम्ही चिपळूणकर लोकचळवळ हा दिवस साजरा करत आहोत.