शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निवडणुकीपेक्षा जपला माणूसकीचा ओलावा

By admin | Updated: October 20, 2014 22:32 IST

जगावेगळं ‘राजकारण’ : पराजित निकमांसाठी विजयी चव्हाणांच्या डोळ्यात पाणी

सुभाष कदम -चिपळूण --माणूस हा नातीगोती, समाज आणि आपलेपणा जोपासणारा असतो. माणूस कुठेही गेला तरी आपल्यावरील संस्कार आणि विनयशीलपणा सातत्याने जपत असतो. काही माणसं विजयाने हुरळून जात नाहीत व अपयशाने खचतही नाहीत. मात्र या नात्यात ‘राजकारण’ शिरलं की त्यातील नातं संपतं आणि राजकारण तेवढंच शिल्लक राहतं. पण याचा विरूध्दार्थी प्रत्यय चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळी आला आणि राजकारणापलिकडे नात्यातील किंमत अधिक मोठी आहे, याचा आदर्श समोर आला. विधानसभा निवडणूका जाहीर झाली आणि या मतदार संघात शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेदवार शेखर निकम हे दोन नातेवाईक आमने-सामने उभे ठाकले. शेखर निकम यांचा भाचा सदानंद चव्हाण यांचा जावई आहे. चिपळूण मतदार संघात दोघांचीही समान ताकद आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रचारात दोघांनीही कमालीचा संयम पाळला. मुळात जाहीर सभा घेणे टाळून प्रत्यक्ष भेटीवर जोर ठेवला. विभागीय किंवा वाडी बैठकीत त्यांनी आपल्यातील नात्याला मरू न देता आरोप करणे टाळले.निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना निकम व चव्हाण शेजारीशेजारी बसले होते. चव्हाण यांची मुलगी निकम यांच्या भाच्याला दिली असल्याने त्यांचे घरगुती नाते आहे. मतमोजणी सुरु असताना अनेकवेळा उमेदवार एकमेकाकडे पाहातही नाहीत. परंतु, या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करीत गप्पा मारल्या. आघाडी कमी अधिक होत होती, याबाबत चर्चा केली. एकमेकांचे मत आजमावले. चौदाव्या फेरीअखेर शेखर निकम आघाडीवर होते. तरीही संगमेश्वरपट्ट्यात आपला निभाव लागणार नाही. आपला साडेपाच हजारांनी पराभव होईल. परंतु, आपण चांगली लढत दिली. काळजी करु नका, पक्ष जोमाने वाढवू, असे निकम सांगत होते आणि आपले प्रतिस्पर्धी असलेल्या चव्हाण यांना धीर देत होते. असे विचित्र चित्र चिपळूणकरांनी पाहिले. सतराव्या फेरीला त्यांनी चव्हाण निवडून येणार असल्याने त्यांना शुभेच्छा देऊन मतमोजणी केंद्र सोडले. त्यानंतरही निकम यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. आपल्यापरीने जे करता येईल ते सर्व केले. यापुढे पक्ष वाढविण्यासाठी जोमाने प्रयत्न करु. सातत्याने कामात राहू, असे सांगितले. खरे तर उमेदवार एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करतात, दुषणे देतात. परंतु, असे काही घडले नाही.आपल्या विजयानंतर आमदार चव्हाण यांच्या पत्नी सीमा चव्हाण या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या असता चव्हाण पती-पत्नीला गलबलून आले. चव्हाण यांनी पेढा भरविला. त्यानंतरचा काही क्षण भावूक होता. निवडणूक प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतरही आमदार चव्हाण त्यातून बाहेर आले नव्हते. भावनाविवश होत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. माझ्या एका डोळ्यात आनंदाश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात दुखाश्रू आहेत. निकम माझे नातेवाईक आहेत. माझ्या मुलीला आनंद झाला असेल. परंतु, माझ्या जावयाना वाईट वाटले असेल. त्यांना संमिश्र आनंद झाला असेल, याची जाणीव मला आहे. निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम केले आहे हे नाकारुन चालणार नाही. चिपळूण तालुक्यापेक्षा संगमेश्वर तालुक्याने आपल्याला अधिक साथ दिली, याबद्दल त्यांनी संगमेश्वर तालुक्याचे अधिक ऋण व्यक्त केले.निकम यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. हे दोघांचेही यश आहे. दोघांनीही आपल्या नात्याची विण राजकारणापलिकडे जाऊन अधिक घट्ट केली. हेही नसे थोडके. राजकारणातील जय पराजय खिलाडूवृत्तीने त्यांनी स्वीकारला यातच त्यांच्या माणुसकीचे दर्शन झाले.