शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक बाजारपेठेतील हापूस आंब्याचे भाव कोसळले

By admin | Updated: May 23, 2016 00:17 IST

हंगाम समाप्तीकडे : कॅनिंगच्या दरावरही परिणाम

रत्नागिरी : आंबापीक शेवटच्या टप्प्यात असून, मुंबई मार्केटबरोबर स्थानिक बाजारपेठेत दर कोसळले आहेत. कॅनिंगच्या दरावरही त्याचा परिणाम झाला आहे. पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना झाडावरील आंबा उतरविण्याची संधी प्राप्त झाली आहे.मान्सूनपूर्व पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेवटच्या टप्प्यातील आंबा काढणे शक्य झाले आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे दरवर्षीपेक्षा आंबा लवकर बाजारात आला. मात्र प्रमाण अत्यल्प होते. थंडीमुळे पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाल्याने त्याचा फटका सर्वाधिक बसला. जेमतेम २० ते २५ टक्के आंबा उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. एकूणच पीक कमी असताना सुरूवातीपासूनच दर स्थिर राहिले नाहीत. वाशी मार्केटबरोबर स्थानिक मार्केटमध्येही दर कोसळले. सध्या वाशी मार्केटमध्ये पेटीला दर ५०० रुपये देण्यात येत आहे. आंबा काढणीपासून वर्गवारी, पॅकिंग, हमाली, दलाली खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम तूटपुंजी असल्यामुळे मुंबईला आंबा विक्रीस पाठवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात शेतकरी आंबा विक्री करत आहेत. रस्त्याच्या कडेलाही काही शेतकरी आंबा विक्री करीत आहेत. सध्या स्थानिक बाजारात १०० ते २५० रुपये डझनाने आंबा विकण्यात येत आहे. कॅनिंगच्या दरातही घसरण झाली आहे. दर १८ ते २० रुपयांवर स्थिरावला आहे. जिल्हाभरातून दररोज हजारो टन आंबा खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने कॅनिंगचे प्रमाण घटले आहे. उष्मा वाढल्याने झाडावरच आंबा पिकू लागला आहे. कॅनिंग विक्रेते हा आंबा स्वीकारत नाहीत. त्यामुळे विक्रीबरोबर आमरस, मावा, आंबावडी तयार करण्यासाठी त्याचा वापर सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी घरगुती उत्पादनाकडे मोर्चा वळविला आहे. पर्यटकांकडून आंबा खरेदीबरोबर आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष मागणी होत आहे.छोट्या बिटक्या, रायवळ, पायरी केसर जातीचे आंबे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पावसाने अवधी दिल्यामुळे शेतकरी शेवटच्या टप्प्यातील आंबा काढून घेत आहेत. शोधणीचा आंबा काढणी सुरू आहे. येत्या आठवडाभरात हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे.फळप्रक्रिया केंद्रात मात्र सध्या कामाची लगबग दिसून येत आहे. आमरस, आंबावडी, छुंदा, लोणचे, मुरांबा यांसारखे पदार्थ तयार केले जात आहेत. फळप्रक्रिया केंद्राकडून आंबा कमी किमतीत खरेदी केला जात आहे. मात्र, त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीतून अधिक पैसे उद्योजकाला उपलब्ध होणार आहेत. यावर्षी आंबा उत्पादन घटल्यामुळे प्रक्रिया उत्पादनातही घट झाली आहे. (प्रतिनिधी)