शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड --विद्यार्थी, ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: August 27, 2014 23:25 IST

मनमानीचा निषेध : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून घेतले लेखी आश्वासन

मंडणगड : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात धुत्रोली येथील ग्रामस्थांनी धत्रोली उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत सोमवारपासून अचानक सुरु केलेले बेमुदत उपोषण गटशिक्षणाधिकारी पानगे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले.धुत्रोली मोहल्ला येथील उर्दू शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून आठवीचा वर्ग नव्याने सुरु करण्यात आला. शासनाच्या निकषानुसार, चार शिक्षक असतानाही शिक्षण विभागाने शाळेतील एका शिक्षकाला कामगिरीवर काढले. दुसरीकडे आठवीचा वर्ग सुरु झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासन अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करेपर्यंत शिक्षण विभागाने पाचवा शिक्षक कामगिरीवर काढावा, या मागणीसाठी ग्रामस्थ महिनाभर आग्रही आहेत.शिक्षण विभाग व गटविकास अधिकारी केवळ चालढकल करीत असल्याचे या प्रकरणात निष्पन्न झाल्याने आक्रमक ग्रामस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांना समवेत घेऊन भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोरील पटांगण गाठले व उपोषण सुरू केले.ग्रामस्थांनी अचानक घेतलेल्या पवित्र्याने प्रशासन बुचकळ्यात पडले. यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, अ‍ॅड. अभिजीत गांधी, उपतालुकाप्रमुख दोस्त चौगुल यांनी उपोषणकर्त्यांची भूमिका समजून घेतली. पंचायत समिती सदस्य आदेश केणे यांनी पंचायत समिती गाठली. सभापती अमिता शिंंदे, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करुन तांत्रिक बाबतीत बसत नसले तरी मार्ग काढण्याची विनंती केली. यानंतर कामगिरीवरील शिक्षक देण्याचे संबंधितांकडून मान्य करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांची तहसील कार्यालयासमोर भेट घेऊन उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, ग्रामस्थांनी आश्वसनाचे लेखी पत्र देण्याची मागणी केली. त्यानंतर उपोषण मागे घेतले. ग्रामपंचायत सदस्य इरफान बुुरोंडकर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थ संतोष पाटे, आयुब बुरोंडकर, आकार बुरोंडकर, जकरीया बुरोंडकर, ललिफ बुरोंडकर, मजिद बुरोेंडकर, अस्लम कडेवकर, महेबूब कडवेकर उपोषणाला बसले होते. (प्रतिनिधी)मंडणगड तहसील कार्यालयासमोर धुत्रोली येथील ग्रामस्थांसह विद्यार्थीही उपोषणाला बसले होते.