शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चाकाळे येथे मामाचा भाच्यावर काेयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:37 IST

खेड : दारूच्या पैशासाठी पत्नीला काेयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला राेखणाऱ्या भाच्यावरच हल्ला केल्याची घटना खेड तालुक्यातील ...

खेड : दारूच्या पैशासाठी पत्नीला काेयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला राेखणाऱ्या भाच्यावरच हल्ला केल्याची घटना खेड तालुक्यातील चाकाळे येथे १४ राेजी दुपारी ३ वाजता घडली. या घटनेत भाचा पंकज वाडकर जखमी झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चाकाळे हनुमाननगर येथे दि. १४ रोजी सायंकाळी उमेश सदानंद उतेकर (४५, रा. हनुमाननगर, चाकाळे) हा पत्नी सुमतीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. तिने पैसे नसल्याचे सांगितल्याने उमेश याला राग आला व त्याने शिवीगाळ करत कोयत्याने जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. या प्रकाराने घाबरलेली सुमती घराबाहेर पळाली. तेव्हा तेथे उभा असलेला तिचा मुलगा ओमकार व भाचा पंकज वाडकर यांनी उमेश याला रोखण्याचा व समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उमेश याने पंकज याच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये पंकजच्या डाव्या डोळ्यावर गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती सुमती हिने खेड पोलीस स्थानकात दिल्यानंतर उमेश विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.