शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी

अंधांचे जीवन प्रकाशमय होण्यासाठी नेत्रदान करा

By admin | Updated: July 27, 2015 00:35 IST

अण्णा शिरगावकर : सह्याद्री निसर्गमित्रकडे नेत्र, देहदानाचे संकल्पपत्र सुपूर्द...

चिपळूण : एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनावश्य रुढी परंपरा मोडून टाका. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून हजारो अंधांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी नेत्रदान करा. मृत्यूनंतरसुध्दा समाजाच्या उपयोगासाठी देहदान करा असे आवाहन इतिहासतज्ज्ञ व सागरपुत्र संस्थेचे संस्थापक अण्णा शिरगावकर यांनी केले आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेकडे शिरगावकर यांनी स्वत:चे नेत्रदान व देहदान संकल्पपत्र सुपूर्द केले यावेळी ते बोलत होते. शिरगावकर यांनी पत्नी नंदिनी शिरगावकर यांच्या मृत्युपश्चात मुलीच्या हस्ते अग्नीसंस्कार केले तर उत्तरकार्यावर भरमसाठ खर्च करण्याऐवजी त्यांनी अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था, मुलींचे वसतीगृह अशा सामाजिक कार्याला मदत केली. त्याचप्रमाणे मृत्युपश्चात देहही सत्कारणी लागावा यासाठी त्यांनी देहदान व नेत्रदान नोंदणी केली आहे. देह ही नश्वर गोष्ट आहे तर डोळे हे मृत्यूनंतरही उपयोगात येणारा अवयव आहे. पुढील पिढीला तो दृष्टी देऊ शकतो, त्यामुळे नेत्रदानाबाबत जागृती गरजेची असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी व वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शरीर रचनेचा अभ्यास आवश्यक असतो. एका वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वसाधारणपणे वर्षाला ३० ते ४० देह अभ्यासासाठी आवश्यक असतात. देहदात्यांमार्फत दरवर्षी अंदाजे २५ ते ३० देह उपलब्ध होतात. परंतु, ते पुरेसे ठरत नाहीत. देहदानाबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. सह्याद्री निसर्ग मित्र व वालावलकर रुग्णालय, वालावलकर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयोगाने देहदानाचे काम सुरु आहे असे संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी सांगितले. (वार्ताहर)७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील १ लाख ५० हजार नेत्रदानाअभावी अंध आहेत. त्यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजारांची भर पडत असते. प्रतिवर्षी केवळ ५० हजार नेत्रदान होते. दीड लाख कॉर्नीयाची भारताला गरज आहे. या नेत्रदानाबरोबरच देहदान करणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी सह्याद्री निसर्ग मित्र युनायटेड पार्क मार्कंडी येथे संपर्क साधावा असे आवाहन उदय पंडित यांनी केले आहे. देहदात्यांमार्फत दरवर्षी २५ ते ३० देह उपलब्ध होतात.देहदानाबद्दल जागृती नसल्याने अडचण.वर्षाला महाविद्यालयाला लागतात ३० ते ४० देह.