शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सहकार वाढवणाऱ्या व्यवसायावर गदा

By admin | Updated: November 18, 2014 23:29 IST

रत्नागिरी तालुका : बंदरे बंद होण्याची भीती; रेंगाळलेल्या प्रश्नांवर ना चर्चा ना कृती--रेंगाळलेले प्रश्न

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील सहकार म्हणजे मासेमारी व्यवसाय होय़ हा व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना अनेक समस्या, अडचणींना सामोरे जावे लागते़ तालुक्यातील मिरकरवाडा बंदर हे राज्यातील मच्छिमारीच्या दृष्टीने क्रमांक एकचे बंदर आहे़ मात्र, हे बंदर अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे़ कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बंदरातून होत आहे़ येथून गोवा, कर्नाटक, मुंबई, केरळ व अन्य राज्यांमध्ये माशांची निर्यात केली जात असली तरी हे बंदर अनेक सोयीसुविधांपासून दूर आहे़ तसेच तालुक्यातील भाट्ये खाडीच्या मुखाशी गाळ साठल्याने येथील मच्छिमारांना धोकादायक स्थितीत समुद्रात जावे लागते़ अशा महत्त्वाच्या बंदरांचा विकास होणे आवश्यक आहे़ मच्छिमारांसाठी नुसत्या जेटी बांधून फायद्याचे ठरणार नाही, तर त्यांना योग्य त्या सोयीसुविधा देणेही गरजेचे आहे़ तालुक्यात फिनोलेक्स, जिंदाल, चौगुले, जे़ के. फाईल्स अशा मोठ्या कंपन्या असल्या तरी औद्योगिक वसाहतीमधील अनेक उद्योग बंद आहेत़ यामध्ये गद्रे मरीन ही मासेमारीशी निगडीत असलेली एकमेव कंपनी सुरु असून, या माध्यमातून शेकडो बेरोजगारांच्या रोजगारीचा प्रश्न सुटला आहे़ शासनाने नवीन उद्योगधंद्याना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे़तालुक्यात पर्यटनालाही मोठा वाव आहे़ गोव्याच्या धर्तीवर पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास त्यातून स्थानिकांना छोटे-मोठे व्यवसाय करता येतील़ भाट्ये, मांडवी, आरे-वारे बीच या किनाऱ्यांवर पर्यटनाला मोठा वाव आहे़ पर्यटनामुळे रोजगाराला मोठी संधी आहे. शासनाने पर्यटनाकडे दूरदृष्टीने पाहणे आवश्यक आहे. केवळ पर्यटन विकासाच्या नावाने बोंबा मारण्यापलिकडे काहीही केले जात नाही. त्यामुळे तालुक्यात पर्यटनाचा विकास झाल्यास अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लागेल. कोकणच्या अर्थव्यवस्थेत आंबा पिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. आंब्याची युरोप, अमेरिका व जपान येथे निर्यात सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. मात्र, याचा लाभ केवळ मोजकेच शेतकरी घेतात. त्यामुळे सहकारी तत्त्वावर सर्व शेतकऱ्यांचा आंबा एकत्रित करून निवडक आंब्याची निर्यात केल्यानंतर उर्वरित आंब्यावर प्रक्रिया केल्यास स्थानिक बाजारपेठेत आंब्याचा दर स्थिर राहील. शिवाय आंब्याची कारखानदारी उदयास आली, तर कोकणचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल.युरोपीय देशांच्या एकूण हवामानानुसार युरोगॅप प्रमाणपत्र निश्चित करण्यात आले आहे. निर्यातीसाठी त्याची आवश्यकता आहे. मात्र, आयात - निर्यातीसाठी आपल्या देशाचे गॅप प्रमाणपत्र तयार करणे अत्यावश्यक आहे. अमेरिकेला आंबा पाठवित असताना गॅमा (विकिरण) प्रक्रिया आवश्यक आहे. सध्या लासलगाव (नाशिक) येथे ही सुविधा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिकच्या अंतरामुळे वाहतूक खर्च जादा होत असल्याने नाचणे (रत्नागिरी) येथे ही सुविधा सुरू करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने वाशी (नवी मुंबई) येथे उभारण्याची घोषणा करण्यात आली. याला चार वर्षे लोटली तरी अद्याप काम अपूर्ण आहे. महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, वाशी येथे असल्यामुळे गॅमा प्रक्रिया केंद्राची आवश्यकता आहे.शेतकऱ्यांचा माल पणन मंडळाच्या केंद्रात आल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. निर्यातदार, शेतकरी, शेतकऱ्यांचे मंडळ किंवा संस्था त्यांच्यासाठी वेगळे निकष लावण्याची आवश्यकता आहे. शिवाय शेतकरी, मंडळे, संस्था यांना सुविधेचा वापर करण्याबरोबर भाड्यात सवलत, वाहतूक (एअरफं्रेंट) पॅकिंग खर्चावर विशेष अनुदान देण्यात यावे. तसेच आंबा वाहतुकीसाठी रिफर्ड व्हॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामार्फत आंबा निर्यात सुविधा केंद्राना १०० टक्के अनुदानावर उपलब्ध झाल्यास वाहतूक समस्या मार्गी लागेल.आंब्याबरोबर काजू, करवंद, फणस या पिकांवरील संशोधनासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राची आवश्यकता आहे. शेतकरी, कृषी विभाग, फलोत्पादन कृषी विद्यापीठ, अ‍ॅपेडा, पणन मंडळ, शासकीय व अशासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळा, निर्यात विभाग, जिल्हा अग्रणी बँक अशा सर्व संबंधित विभागांची एकत्रित समिती किंवा मंडळाची स्थापना होणे आवश्यक आहे. याशिवाय कोकण कृषी विद्यापीठामध्ये स्वतंत्र विभागाची स्थापना करून शेतकऱ्यांना निर्यातीबरोबर खते, कीटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन केले जावे. याचबरोबर माती व पाणी परीक्षणाबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.रत्नागिरी तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्नही अद्याप तसेच आहेत. जयगड, रत्नागिरी शहर, गावडेआंबेरे याबरोबरच अन्य भागातील रस्तेही खराब आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबरीकरण निखळून गेले आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्याचा विचार केला तर एवढ्या वर्षांमध्ये मूलभूत प्रश्नही सुटलेले नसल्याचे दिसून येते. (शहर वार्ताहर)हापूस इकडं, व्हीएचटी तिकडं!आंबा किती टक्के पिकवावा, पिकविण्यास कोणत्या पध्दतीचा अवलंब केला जावा, तर व्हेपर हीट ट्रीटमेंटनंतर आंबा किती प्रमाणात थंड करावा, वाहतुकीच्या वेळी तापमान किती असावे, याबाबत शेतकऱ्यांना माहिती आवश्यक आहे. व्हेपर हीट ट्रीटमेंट सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाने वाशी येथे सुरू केले आहे. मात्र, ही सेवा अपुरी असल्याने नाचणे येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळ येथे व्हीएचटी सुविधा उभारणे आवश्यक आहे.नंबर एकचे बंदर, नंबर एकच्या समस्या...!मिरकरवाडा बंदरात मच्छिमारांसाठी शीतगृह आवश्यक आहे़ जेणेकरुन मासे टिकवण्यास त्याची मोठी मदत होईल. तसेच बंदरातील गाळाची समस्या कायमची दूर होणे आवश्यक आहे़ बंदरावर रात्रीच्या वेळी या व्यवसायाची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरु असते़ अशावेळी येथे विजेची सोय असणे आवश्यक आहे़ मात्र, या बंदरात पाणी, वीज आणि रस्त्यांचीही सोय नाही़ पाण्यासाठी बाहेरुन सोय करावी लागत असल्याने ते आणण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तालुक्यातील मच्छिमारांना अनेक समस्या भेडसावत आहेत, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.काजूचं बोंडही वायाचहजारो हातांना काम मिळवून देणारा काजू बोंडाचाही व्यवसाय दुर्लक्षितच आहे. या व्यवसायाकडे कुणीही गांभीर्याने न पाहिल्याने अजूनही हजारो टन काजूबोंडे मातीमोल होत आहेत.अनेक उद्योगांना घरघर...बंद उद्योग सुरु करण्याबाबत आजपर्यंत काहीही प्रयत्न झालेले नाहीत़ हे उद्योग सुरु झाल्यास मुंबई, पुणे शहरांकडे जाणारा सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा लोंढा कमी होईल़ बेरोजगारी दूर होण्यास मोठी मदत होईल़ त्यासाठी औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरु होणे आवश्यक आहे.