शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

महावितरणला २ कोटी ९५ लाखांचा महसूल

By admin | Updated: January 15, 2016 00:24 IST

आॅनलाईन सुविधा : जिल्ह्यातील २० हजार ४०३ ग्राहकांकडून सुविधेचा लाभ; घरबसल्या वीजबिल भरणा

रत्नागिरी : आॅनलाईन सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरणे सोपे झाले आहे. दिवसेंदिवस आॅनलाईनकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये रत्नागिरी जिल्ह््यातील २० हजार ४०३ ग्राहकांनी या आॅनलाईन सुविधेचा लाभ घेतला असून, यातून महावितरणला २ कोटी ९५ लाख २३ हजार ९८० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.वीजबिल भरण्यासाठी बँका, पोस्ट कार्यालये तसेच पतसंस्थांमध्ये सुविधा उपलब्ध आहे. महावितरण कार्यालयातही वीजबिल भरणा केंद्र सुरू आहे. मात्र, संबंधित ठिकाणी गर्दीमुळे ग्राहकांना रांगेत बराचवेळ उभे राहावे लागते. महावितरणने स्वयंचलित वीजबिल केंद्रही सुरू केले आहे. मात्र, त्याठिकाणी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. सध्या घरोघरी स्मार्टफोन उपलब्ध असल्यामुळे इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध होते. त्यामुळे संगणक, मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करत ग्राहक घरबसल्या वीजबिल भरणा करत आहेत.चिपळूण विभागातून ५ हजार ७५७ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ६८ लाख ३६ हजार ३४० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. खेड विभागातून ३ हजार ४०० ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे ६७ लाख ५९ हजार ६६० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर रत्नागिरी विभागातील ११ हजार २४६ ग्राहकांनी या आॅनलाईन सुविधेचा लाभ घेतल्याने १ कोटी ५९ लाख २७ हजार ९८० रूपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. सर्वाधिक महसूल हा रत्नागिरी विभागातून प्राप्त झाला आहे. चिपळूण शहरी भागातून २१६८ ग्राहकांनी ३१ लाख ९५ हजार ४३० रूपये तर ग्रामीणमधील ८३२ ग्राहकांनी १० लाख ६१ हजार ९७० रुपये, गुहागर येथील १९३५ ग्राहकांनी १५ लाख ५२ हजार ९९० रुपये, सावर्डेतील ८२२ ग्राहकांनी आॅनलाईन बील भरणा केल्यामुळे १० लाख २५ हजार ९५० रूपयांचा महसूल चिपळूण विभागातून प्राप्त झाला आहे.खेड विभागातील दापोली १ मधील ७०१ ग्राहकांनी ११ लाख ८३ हजार ५३० रूपये, खेड येथील ५७७ ग्राहकांनी १० लाख २४ हजार २९० रुपये, मंडणगड येथील ५९४ ग्राहकांनी ५ लाख ७८ हजार ७९० रुपये, दापोली २ मधील ५६० ग्राहकांनी १३ लाख ३१ हजार ३२० रुपये, लोटेतील ९६८ ग्राहकांनी आॅनलाईन बील भरल्यामुळे २६ लाख ४१ हजार ७३० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे. रत्नागिरी विभागातील देवरूख येथील ६३० ग्राहकांनी ७ लाख ६१ हजार ६० रुपये, रत्नागिरी ग्रामीण १ मधील १६११ ग्राहकांनी २१ लाख १३ हजार ६५० रुपये, ग्रामीण २ मधील ५२६ ग्राहकांनी १९ लाख ४१ हजार ५५० रुपये, लांजा येथील ५८२ ग्राहकांनी ९ लाख ८८ हजार १९० रुपये, राजापूर मधील ३०२२ ग्राहकांनी १९ लाख ८३ हजार ९० रुपये, राजापूर २ मधील ७८५ ग्राहकांनी ५ लाख ८२ हजार ८० रुपये तर संगमेश्वर येथील ६०४ ग्राहकांकडून ८ लाख २३ हजार २६० रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)