शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रापासून विदर्भ तोडू देणार नाही

By admin | Updated: January 22, 2016 01:13 IST

रामदास कदम : सहजीवन शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव

खेड : महाराष्ट्रातील एकूण सिंचनापैकी २० टक्के सिंचन कोकणात होत असले तरीही कोकणाचाच भकास होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोयनेचे पाणी कोकणातच राहणार, ते मुंबईत जाऊ देणार नाही, असा निर्धारही बोलून दाखवला. दुष्काळग्रस्त विदर्भात आपण लक्ष घातले असून, कोणत्याही परिस्थितीत विदर्भ महाराष्ट्रापासून तोडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले़खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी विविध उपक्रमांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून पर्यावरणमंत्री रामदास कदम बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते संस्थेच्या आयटी सेंटरचे उद्घाटन, रामदास कदम यांच्याहस्ते संस्थेच्या इनडोअर ट्रेनिंग सेंटरचे आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले.अध्यक्षस्थानी माजी आमदार निशिकांत जोशी होते. आमदार निरंजन डावखरे, कराडचे आमदार आनंद पाटील, विजय मेहता, रमा भोसले, सतीश भोसले, मनसेचे वैभव खेडेकर, योगेश कदम आणि रामचंद्र दळवी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. कराड -चिपळूण हा मार्ग रेल्वेने जोडण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याने आणि विशेषत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकणातीलच असल्याने हा मार्ग पूर्णत्त्वास जाईल, असे ते म्हणाले. या प्रकल्पासाठी आमच्या सरकारने ५० टक्के रकमेची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)