शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

रुग्ण हक्क परिषदेचा २ ऑक्टोबरला महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST

चिपळूण : कोरोना रुग्णांच्या बिलाचे फेर लेखापरीक्षण व्हावे, या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषद येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचे ...

चिपळूण : कोरोना रुग्णांच्या बिलाचे फेर लेखापरीक्षण व्हावे, या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषद येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुंबई मंत्रालयावर महामोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील रुग्ण हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व बाधित रुग्ण सहभागी होणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष व दहिवलीचे माजी सरपंच सुहास शंकर पांचाळ यांनी दिली.

रुग्ण हक्क परिषदेच्या मोर्चाबाबत रुग्ण हक्क परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पांचाळ यांनी माहिती दिली. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे पार पडली. कोरोना रूग्णांच्या बिलाचे फेर लेखापरीक्षण व्हावे आणि अतिरिक्त आकारलेल्या बिलाची रक्कम संबंधित रुग्णांना परत मिळावी. कोरोना रुग्णांच्या बिलाबाबत सोलापुरातील माढा तालुक्यामध्ये रुग्ण हक्क परिषदेने फेर लेखापरीक्षणाची मागणी केली होती. त्यात सुमारे २० लाख ४२ हजार २१४ रुपये एवढी रक्कम अतिरिक्त आढळली. ही रक्कम धनादेशाद्वारे रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून परत करण्यात आली. असा हा माढा पॅटर्न राज्यात सर्वत्र राबविण्यात यावा. कोरोनामुळे निराधार झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत शासनाने ठोस धोरण जाहीर करून निराधारांना आधार देण्यासाठीच्या मागणीबाबतचे ठराव या बैठकीत एकमताने घेण्यात आले.

या मागण्या घेऊन २ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय येथे ‘रुग्ण हक्क परिषदेचा’ महामोर्चा निघणार आहे. या मोर्चात कोरोनाचे नियम पाळून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी तालुक्यासह जिल्ह्यात जनजागृतीपर बैठका घेतल्या जात आहेत. त्यांना रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या मोर्चात जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रुग्ण सहभागी होतील, असा विश्वास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. रुग्णांनी अधिक माहितीसाठी संतोष विठ्ठल घाग, कुमार गौरव वायदंडे, उदय पवार, राजेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.